नायलॉनच्या मांजाने गळा कापल्याने पोलीस अधिकारी दिपक पारदे रुग्णालयात अतिदक्षता विभागात दाखल..

उपसंपादक-मंगेश उईके
संभाजीनगर : दिनांक १४/०१/२०२४ रोजी बीड बायपास येथे पोलीस उप निरीक्षक दीपक उत्तमराव पारदे नेमणूक स्थानिक गुन्हे शाखा छत्रपती संभाजी नगर ग्रामीण हे त्यांच्या मोटरसायकल वरून दैनंदिन ड्युटीवर करिता येत असताना त्यांचा गळा नायलॉन मांजा ने कापून गंभीर जखमी झाले होते.
खाजगी व्यक्तींनी त्यांना सिग्मा हॉस्पिटल येथे उपचाराकरिता भरती केले. नायलॉन मांजा मुळे झालेले गळ्याच्या जखमेवरती ऑपरेशन झाले असून सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून अति दक्षता विभागांमध्ये उपचार सुरू आहेत.