१ मे महाराष्ट्र दिनी मुंबई पोलीस आयुक्त श्री. विवेक फणसाळकर यांच्याहस्ते पोलीस महासंचालक पदक मुंबई परीमंडळ-१२ मधील दहिसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. प्रविण पाटील, दहिसर पोलीस ठाण्यात सहायक पोलीस निरीक्षक श्री. संजय बांगर व पोलीस नाईक श्री. सागर पवार यांना प्रदान करून सन्मानित करण्यात आले.
महाराष्ट्र पोलीस दलात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाच्यावतीने पोलीस महासंचालक रजनिश सेठ यांचे “पोलीस महासंचालक पदक २०२३” १ मे महाराष्ट्र व कामगार दिनाचे औचित्य साधून प्रदान करण्यात आले.
महासंचालकांचे पदक प्रदान करून त्यांच्या कामगिरीचा गौरव करण्यात आला. याप्रसंगी इतर वरिष्ठ पोलिस अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान, पोलीस निरीक्षक श्री प्रविण पाटील, एपीआय श्री.संजय बांगर व श्री. सागर पवार यांनी यापूर्वी विविध पोलीस ठाण्यात कार्यरत असतांना आपल्या कार्याचा ठसा उमटविला असून ही परंपरा ते मुंबई पोलिस आयुक्तालयातही कायम राखण्याचा ते प्रयत्न करत आहेत.