गोंदिया ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. चंद्रकांत काळे हे मा.पोलीस महासंचालक यांच्या हस्ते “सर्वोत्कृष्ट अपराध सिद्धी” पुरस्काराने सन्मानित…

उपसंपादक-रणजित मस्के
गोंदिया :- मा. पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य यांचे हस्ते पो.ठाणे गोंदिया ग्रामीण जिल्हा- गोंदिया येथे कार्यरत असलेले पोलीस निरीक्षक श्री. चंद्रकांत काळे, यांना “सर्वोत्कृष्ट अपराध सिद्धी” पुरस्कार प्रदानाने सन्मानित करण्यात आले.


⏩ मा. श्री. रजनीश सेठ, पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य मुंबई, राज्य गुन्हे अन्वेषण विभाग, (सी. आय. डी. ) चे अपर पोलीस महासंचालक मा. श्री. प्रशांत बुरडे, तसेच विशेष पोलीस महानिरीक्षक, श्री. दिलीप पाटील भुजबळ, यांचे हस्ते गोंदिया जिल्हा पोलीस दलात सद्यास्थितीत पोलीस ठाणे गोंदिया ग्रामीण येथे ठाणेदार म्हणून कार्यरत पोलीस निरीक्षक श्री. चंद्रकांत काळे, यांना माहे- ऑक्टोंबर -2022 चा सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे.
राज्याचे पोलीस महासंचालक, मा. श्री. रजनीश सेठ, यांनी पोलीस निरीक्षक , चंद्रकांत काळे यांना गुन्ह्याचे सर्वोत्कृष्ट तपासाबाबतचे प्रशस्तीपत्र आणि रोख रक्कम 25 हजार रुपये देऊन गौरविण्यात आले आहे.
पोलीस निरीक्षक, चंद्रकांत काळे यांनी कन्हान पोलीस ठाण्यात कार्यरत असताना सन- 2018 ला गोंडेगाव, पालनगर, कन्हाण परिसरात दिनांक 19/10/2018 ला एका 11 वर्षाच्या अल्पवयीन मुलीचे अपहरण करून, तिच्यावर शारीरिक लैंगिक अत्याचार करून जिवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आलेला होता. पो. स्टे. कन्हाण , नागपूर ग्रामीण अंतर्गत कलम 363,376, 307 भा. द. वि. अन्वये अज्ञात आरोपीविरूद्ध गुन्हा नोंदविण्यात आले होते. अश्या अत्यंत क्लिष्ट गुन्ह्याचा कौशल्य पुर्ण छडा लावून गुन्ह्याचे तपासात आरोपीला अटक करून गुन्ह्यांत आरोपी विरूद्ध भरपूर साक्षीपुरावे, भौतिक दुवे तपासून आणि, परिस्थितीजन्य पुरावे गोळा करून, सर्वोत्कृष्ट तपास केला. आणि तपासाअंती मुदतीत दोषारोपपत्र न्यायालयात न्यायालयात दाखल करण्यात आले होते. सदर गुन्ह्याचा खटला क्र. 312/2018 अन्वये मा. न्यायालयात चालविण्यात आला. मा. न्यायालयाने आरोपीला सदर गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे....
सदर गुन्ह्यातील नराधम आरोपीला जन्मठेपाच्या शिक्षेपर्यंत पोहचविण्याकरीता तपासी अधिकारी म्हणून पो.नि. काळे यांनी तपासत भरपूर मेहनत, सातत्य राखत, कौशल्य पणाला लावून अथक परिश्रम घेतले होते. या गुन्ह्याची महाराष्ट्र राज्यात ऑक्टोंबर - 2022 या महिन्यासाठी च्या सर्वोत्कृष्ट अपराध सिद्धी पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आणि त्यांना केलेला उत्तम तपासकार्य,कामगिरीबद्दल गौरविण्यात आले आहे.
राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या वतीने (सी.आय.डी.) पोलीस संशोधन केंद्र येथे आयोजित कार्यक्रमात ‘सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी’ बद्दलचे बक्षिस प्रदान करण्यात आले असून सदरचे कार्यक्रमाला राज्य गुन्हे अन्वेषण विभाग (सी.आय. डी.) ’चे अपर पोलीस महासंचालक श्री. प्रशांत बुरडे, विशेष पोलीस महानिरीक्षक श्री. दिलीप पाटील, भुजबळ, आदी वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते....
राज्य गुन्हे अन्वेषण विभाग (‘सी.आय.डी.) तर्फे प्रत्येक महिन्यात अत्यंत क्लिष्ट गुन्ह्याचा सर्वोत्कृष्ट तपास करून आरोपींना शिक्षेपर्यंत पोहचविनाऱ्या राज्यांतील विविध पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस अधिकारी, अंमलदार यांचा राज्यातून सर्व गुन्ह्यांमधून एका गुन्ह्यांची निवड करण्यात येते आणि अश्या गुन्ह्याची ‘सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी’ बक्षिसासाठी निवड केली जाते. राज्यातील विवीध गुन्ह्यामधून नागपूर ग्रामीण पोलिस घटकातील वरील गुन्ह्याची निवड करण्यात आलेली होती...
सदर गुन्ह्याच्या तपासात गोंदिया जिल्ह्यातून पोलीस निरीक्षक चंद्रकांत काळे यांचा अपर पोलीस महासंचालक श्री. प्रशांत बुरडे व विशेष पोलीस महानिरीक्षक श्री. दिलीप पाटील, भुजबळ यांच्या हस्ते प्रशस्तिपत्र, गौरव चिन्ह आणि 25 हजार रुपये बक्षिस देण्यात आले आहे.
पोलीस अधीक्षक श्री. निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक श्री. अशोक बनकर, यांनी उत्कृष्ठ तपास करणाऱ्या पोलीस निरीक्षक, आणि संपुर्ण तपास कार्यात तसेच न्यायलयीन कामात मदत करणाऱ्या संपुर्ण टीम चे कौतुक आणि अभिनंदन करून शुभेच्छा दिल्यात.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com