आंध्र पोलीस स्टेशनचे स.पोलीस नि.श्री. धोंडीराम वाळवेकर यांनी टिमसह मौजे वरुड ता खटाव येथे छापा मारुन एकुण २,०४,५००/- रुपये किमतीचा गांजा केला जप्त…

उपसंपादक – रणजित मस्के
सातारा :- मा. समीर शेख पोलीस अधीक्षक सो सातारा, मा. आंचल दलाल, अपर पोलीस अधीक्षक सातारा यांचे सुचनेप्रमाणे व मा. अश्विनी शेंडगे उपविभागीय पोलीस अधिकारी, दहिवडी विभाग कॅम्प वडुज यांचे मार्गदर्शनाखाली धोंडीराम वाळवेकर सहा पोलीस निरीक्षक प्रभारी अधिकारी आँध पोलीस स्टेशन यांना मौजे वरुड ता खटाव येथिल साळुंखेवस्ती मधील इसम नामे ईश्वर दत्तात्रय जगदाळे हा त्याचे गुरांचे गोठ्यालगत ओढयाचे कडेला गांजाचे झाडे लावुन आणि त्याची विक्री करीत असलेबाबत खात्रीशीर माहिती मिळाली.
त्यांनी आपले सोबत पोउपनि केंद्रे सपोफी पाटोळे, पो.हवा / १७२९ देवकुळे, पो हवा / २४३ बनसोडे, पोकॉ/ २३९२ भुजबळ, पो कॉ/२५०३ झारी, पो कॉ / २०१७ जाधव, पोकों/ १४९८ कदम, मपोकों / ११० फडतरे, मपोकों / २४०८ भुजबळ यांचे पथक तयार करुन सरकारी पंच, फोटोग्राफर, वजनकाटा धारक यांना सोबत चेवुन मौजे वरुड ता खटाव जि सातारा येथील साळुखे वस्ती मधील इसम नामे ईश्वर दत्तात्रय जगदाळे यांचे गुरांचे गोठ्याजवळ छापा मारून सुमारे २,०४,५००/- रुपये किमतीचा गांजा त्यात लागवड केलेली गांजाची झाडे असा मुद्देमाल जप्त केलेला असुन आंघ पोलीस स्टेशनला गुरनं २८९ / २०२३ गुंगीकारक औषध द्रव्य आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ कलम ८.२० (अ) (ब). (२) २२ (क) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई वेळी पोलीसांनी वेषांतर करुन गुरांची माहिती विचारत सदर आरोपींचे गुरांचे गोठ्याजवळील बारकाईने पाहणी करुन सदरच्या गांजाची झाडे शोधुन यशस्वी कारवाई केलेली आहे.
आंध्र पोलीस स्टेशनची आतापर्यंतची सर्वात मोठ्या रकमेची गांजाची कारवाई केलेने आंध्र परिसरातील नागरीकांनी पोलीसांचे अभिनंदन केले आहे.
सदर कारवाईमुळे आंध्र परिसरातील अवैद्य धंदे करणाऱ्या लोकांवर चाप बसणार असुन गांजामुळे तरुण पिढी व्यसनाधिनतेपासून परावृत्त होणार आहे.
सदरची कारवाई ही मा. समीर शेख पोलीस अधीक्षक सो सातारा, मा. आंचल दलाल अपर पोलीस अधीक्षक सातारा यांचे सुचनेप्रमाणे व मा. अश्विनी शेंडगे उपविभागीय पोलीस अधिकारी, दहिवडी विभाग कॅम्प वडुज यांचे मार्गदर्शनाखाली घोंडीराम वाळवेकर सहा. पोलीस निरीक्षक व गंगाप्रसाद केंद्रे पोलीस उपनिरीक्षक, सहा. फौज.पी.एस. पाटोळे, पो.हवा. डी वाय देवकुळे, पो हवा. आर एस बनसोडे, पो. कॉ. पी. डी. भुजबळ, पो कॉ एम आर जाधव, पो को. एस एम झारी, पो कॉ एम व्ही कदम, मपोको एम. के. फडतरे, मपोकों एन. पी. केली आहे. भुजबळ यांनी केली आहे.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com