पोलीस उपायुक्त परिमंडळ -५ तर्फे फिर्यादीना परत मिळवून दिलेल्या रकमेबाबत मानले आभार..

सह संपादक-रणजित मस्के
पुणे
बिबवेवाडी पोलीस स्टेशन गुन्हा रजि. नं.04/2023 IPC 406, 420. मधील फिर्यादी श्री कुंदन दगडू काटे यांची आरोपी चेतन अनिल गादेकर यांनी. फिर्यादी यांना क्रेडिट कार्डवर एक स्कीम असून त्यातून तुला महिन्याला करोडो रुपयाचा ट्रांजेक्शन करून देतो असा विश्वास संपादन करून त्यांची फसवणूक केली असल्याबाबत गुन्हा दाखल होता.










तरी, दाखल गुन्ह्याच्या अनुषंगाने, सदर फिर्यादी यांची फसवणूक केलेली साडेपाच लाख रुपये कॅश जप्त करण्यात आली होती. त्या अनुषंगाने आज रोजी. मा .डीसीपी श्री राजकुमार शिंदे साहेब पोलीस उपायुक्त परिमंडळ 05 यांच्या हस्ते फिर्यादी यांना देण्यात आली आहे. त्यावेळी फिर्यादी यांनी पोलिसांचे आभार मानले.