नंदुरबार येथे ‘पोलीस दादाहा सेतू’ उपक्रमास उद्या अक्कलकुवा येथे प्रारंभ…

0
Spread the love

उपसंपादक – रणजित मस्के

नंदुरबार :

पालकमंत्र्यांची उपस्थिती; जिल्हा पोलिस अधीक्षकांची माहिती वेगवेगळ्या शासकीय / निमशासकीय

नंदुरबार, ता. ८: विविध शासकीय योजनांचे लाभ किंवा शासकीय योजनांची माहिती तसेच शासकीय योजनांबाबत मार्गदर्शन एकाच ठिकाणी मिळावे, यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी ‘पोलीस दादाहा सेतू’ हा समाजोपयोगी उपक्रम राबविण्याचे निश्चित केले असून, त्याची सुरवात अक्कलकुवा पोलिस ठाण्यापासून होणार आहे.

या उपक्रमाचे उद्घाटन रविवारी
(ता. १०) दुपारी बाराला अक्कलकुवा पोलीस ठाणे येथे पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित, जिल्हा पोलिस अधीक्षक पी. आर. पाटील, अपर पोलीस अधीक्षक नीलेश तांबे, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोदकुमार पवार यांच्या
उपस्थितीत होणार आहे.

स्थानिक बोलीभाषेत ‘पोलीस दादाहा सेतू’ म्हणजे ‘पोलीस दादाचा सेतू’ असा आहे. या ठिकाणी नागरिकांचे शासकीय काम पोलीस दलामार्फत शासकीय कार्यालयात पोचवून झालेली कामे, दाखले, प्रमाणपत्रे इत्यादी नागरिकांना परत मिळणार आहेत. म्हणजेच पोलीस दल, नागरिक व शासकीय कार्यालये यामध्ये सेतू पुलाची भूमिका पार पाडणार आहे. या संकल्पनेतून पोलीस दादाहा सेतू असे नामकरण केले आहे.

नंदुरबार हा आदिवासीबहुल लोकसंख्या असलेला जिल्हा आहे. जिल्ह्यातील अक्कलकुवा, तळोदा, मोलगी, नवापूर, धडगाव, म्हसावद इत्यादी पोलीस ठाणे हद्दीत राहणारे नागरिक अतिदुर्गम भागात वास्तव्य करीत असतात. आदिवासी बांधवांना
कामांसाठी आवश्यक असणारी शासकीय कागदपत्रे काढण्यासाठी जिल्हा किंवा तालुक्याच्या ठिकाणी विविध कार्यालयात जावे लागते. अशा वेळी तेथे गेल्यानंतर त्यांना आवश्यक असणारे कागदपत्रे कुठे मिळतात, कुणाकडे अर्ज करावा, त्यासाठी लागणारे कागदपत्र कोणते, किती दिवसांत मिळतील, त्याची प्रक्रिया काय, याबाबत माहिती नसल्यामुळे किंवा अशिक्षितपणा / अज्ञानामुळे कागदपत्रे काढण्यासाठी मोठ्या प्रमाणात अडचणी येत असतात. या उपक्रमामुळे आदिवासी बांधवांच्या पैशांची बचत व वेळेचा होणारा अपव्यय वाचणार आहे. सर्व कामे विनामूल्य होणार आहेत. या उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांमध्ये स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात येणार आहे.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट