छत्रपती संभाजीनगर येथे गाडी लावण्याच्या वादातून पोलीस कर्मचारी यांना मारहाण…

0
Spread the love

उपसंपादक-रणजित मस्के

औरंगाबाद:

रविवार दिनांक 6 ऑगस्ट 2023 रोजी संभाजीनगरमध्ये जोरदार राडा झाला आहे, यामध्ये पोलिसालाही मारहाण झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

सिडको बस स्टॅण्ड टी पॉईंट रस्त्यावर वाईन शॉपच्या बाजूला एम्स हॉस्पिटल आहे. या हॉस्पिटलसमोर गाडी पार्क करण्याच्या कारणावरून एम्स हॉस्पिटलचे कर्मचारी आणि वाहन चालकांमध्ये शाब्दिक चकमक झाली.

यानंतर वाहन चालकाने सुरक्षारक्षकांना मारहाण केली. या मारहाणीमध्ये हॉस्पिटलचे सुरक्षारक्षक जखमी झाले.
सुरक्षारक्षकांवर हल्ला झाल्यानंतर हॉस्पिटलमधील इतर कर्मचाऱ्यांनी पोलिसांना फोन करून बोलवून घेतलं.

यावेळी पोलिसांनी वाहनचालकाला गाडी बाजूला घ्यायला सांगितली, पण वाहनचालकाने पोलिसांसोबतही वाद घालायला सुरूवात केली. पुढे वाहन चालक आणि त्याच्या आई-वडिलांनी पोलिसांना मारहाण केल्याची घटना घडल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली आहे.

याबाबतचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याप्रकरणी हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांनी पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली आहे.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट