ब्लेडने अंगावर वार करणाऱ्या आरोपीला पकडणाऱ्या पोलीस काॅनसटेबल श्री राहुल जाधव यांच्यावर होतोय कौतुकांचा वर्षाव..!
उपसंपादक-रणजित मस्के
मुंबई:– भायखळा रेल्वे स्टेशनला लोकल डब्यात चोरी करून हल्ला करणाऱ्या आरोपीना मुंबई पोलीस कॉन्स्टेबल राहुल जाधव यांनी पकडून रेल्वे पोलीस स्टेशनला जमा केले.

भायखळा रेल्वे स्टेशन (मुंबई) :- भायखळा ते सी.एस.टी. रेल्वे टर्मिनलला जाणाऱ्या लोकल ट्रेन मध्ये तीन आरोपी ट्रेन मध्ये प्रवास करत करत ट्रेन मधूनप्रवास करणाऱ्या दोन व्यक्तीचे साहित्य चोरून घेऊन पळून जात असताना त्यांना प्रवाशांनी पाहिले व प्रवाशी चोर चोर ओरडू लागल्यावर त्या आरोपीनी ज्या व्यक्तीचे साहित्य चोरले त्यांना चाकू सारख्या टोकदार वस्तुने वार केला.

त्यावेळेस त्या ठिकाणी प्लॅटफॉर्म वर असलेले पोलीस कॉन्स्टेबल श्री राहुल संजय जाधव (मुंबई पोलीस) यांनी तात्काळ त्या आरोपीना रंगेहाथ पकडले.
सदर आरोपीनी ट्रेन मध्ये प्रवास करणाऱ्या इसमास टोकदार हत्याराने गंभीर जखमी केले, तसेच पोलीस कॉन्स्टेबल राहुल जाधव यांना देखील ब्लेडने वार केला. जखमी इसमाच्या पोटातून रक्तस्त्राव होत होता. त्याच्या हातात हत्यार असताना देखील पोलीस कॉस्टेबल राहुल जाधव यांनी तात्काळ त्यापैकी दोन आरोपीना पकडून भायखळा रेल्वे पोलिसांच्या ताब्यात दिले.
सदर आरोपीना पकडताना आरोपीनी जाधव यांना देखील ब्लेडने वार केला. तरी देखील स्वतःच्या जीवाची पर्वा न करीता सदर आरोपीना सिताफीतीने पकडले. अशा पोलीसांना सुरक्षा पोलीस टाइम्सचा सलाम.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com