पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पायी चालत कोरेगाव पार्क परिसरातील नागरिकांच्या समस्यांबाबत निवारण करण्यात दिले आदेश ..

उपसंपादक-रणजित मस्के
पुणे:
कोरेगाव पार्क परिसरातील नागरिकांच्या समस्येच्या अनुषंगाने पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी भेट देऊन आढावा घेतला.
यावेळी अपर पोलीस आयुक्त मनोज कुमार पाटील, प्रवीणकुमार पाटील, पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील, आदी वरिष्ठ पोलिस अधिकारी उपस्थित होते.
अमितेश कुमार यांनी पायी चालत परिसराची पाहणी करत नागरिकांच्या समस्या ऐकून घेतल्या. त्याचवेळी याबाबत तात्काळ कडक उपाययोजना करायच्या सूचना देखील अधिकाऱ्यांना दिल्या.