पोलीस भरती विद्यार्थ्यांना विजेंद्र करिअर अकॅडमी सांगली तर्फे विशेष मार्गदर्शन…!

0
Spread the love

प्रतिनिधी-दिप्ती भोगल

गुरुवार दिनांक 17 फेब्रुवारी 2022 रोजी सांगलीत जिल्ह्यातील पोलीस भरती विद्यार्थांना तालुका शिराळा, शेडगेवाडी येथे विशेष मार्गदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमात विजेंद करीअर अकॅडमीचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री. निलेश भाकरे सर व त्यांचे इतर सहकारी शिक्षक व इतर मान्यवर यानी गेल्या 4 वर्षापासुन कठीण परिस्थितीवर मात करून ही अकॅडमी अगदी शून्यातून उभी केली आहे.

या अकॅडमीतील बरेच गरीब , होतकरू व शेतकऱ्यांची मुले परिस्थिती अभावी काही विद्यार्थी यांचे पैसे न घेता पोलीस, आर्मी व नेव्ही, एअर फोर्स सारख्या क्षेत्रात आपले स्थान निर्माण करत आहेत.

नुकत्याच झालेल्या 2021 महाराष्ट्र पोलीस भरती मध्ये या अकॅडमीतील 11 विदयार्थी उत्तमरीत्या गुण मिळवून यशस्वी झाले आहेत.
व अशाच अजून नवीन विद्यार्थी यांना अगामी भरती साठी मोलाचे मार्गदर्शन करण्यासाठी सांगलीतील कर्तव्य दक्ष अधिकारी म्हणून ओळखले जाणारे कोकरूड पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक मा. श्री. ज्ञानदेव वाघ साहेब यांनी मी कसा अधिकारी घडलो व त्यांचा ह्या मागचा खडतर प्रवास व येणाऱ्या 7200 पोलीस भरती विषयी मोलाचे मार्गदर्शन केले व विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छाही दिल्या.

या कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून मा.श्री. ज्ञानदेव वाघ सहायक पोलीस निरीक्षक कोकरूड पोलीस ठाणे तसेच विजेंद्र करिअर अकॅडमीचे संचालक मा.श्री. निलेश भाकरे सर,मा.श्री. गणेश चोरगे सर व मा.श्री. सुनिल रोडे सर यांची विशेष उपस्थिती लाभली.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः

मोबा.नं. 9920601001

info@surakshapolicetimes.com

dipakbhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *