रविवार पेठ सातारा येथील स्वच्छतागृहामध्ये प्लॅस्टिकच्या पुतळयास साडी घालून ठेवणारे इसम पोलीसांच्या ताब्यात

0
Spread the love

उपसंपादक – रणजित मस्के

सातारा :- सातारा शहर परिसरातील रविवार पेठ, लोणार गल्ली येथील महिलांचे स्वच्छतागृहामध्ये दि. २४/१२/२०२३ रोजी रात्रीचे वेळेत लाईट गेल्याचा गैर फायदा घेवून अज्ञात इसमाने खोडसाळपणे महिलेचा पुतळा साडी घालून ठेवलेला आढळून आलेला होता. सदर प्रकारामुळे सदर परिसरातील महिलांमध्ये मिती निर्माण झालेली होती, तसेच सोशल मिडीयावर देखील सदर घटनेबाबत बातमी प्रसारित झालेने महिला आयोगाने देखील गंभीर दखल घेतलेली होती.

सदर घटनेची माहिती मिळताच मा. पोलीस अधिक्षक सो, समीर शेख, मा. अप्पर पोलीस अधिक्षक श्रीमती आंचल दलाल, मा.उप.वि.पोलीस अधिकारी सो, किरणकुमार सुर्यवंशी, मा. वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री. महेंद्र जगलाप यांनी सदरचा प्रकार करणारे इसमांना शोधणेबाबत सुचना दिल्याने तात्काळ सातारा शहर पोलीस ठाणेचे गुन्हे प्रकटीकरण पथकाने घटनेची सविस्तर माहिती प्राप्त करून सदर मागामध्ये गोपनीय माहिती घेवून एका युवकास ताब्यात घेतले असता त्याने व त्याचे सोबत अन्य दोन युवक व एक महिला अशांनी मिळून सदरचा पुतळा घेवून त्यास साडी घालून त्यास मेकअप करून महिलांना मिती निर्माण व्हावी या हेतूने सदरचा पुतळा महिला स्वच्छतागृहामध्ये ठेवला असल्याचे सांगितले, संबंधित लोकाचेवर सार्वजनिक ठिकाणी उपद्रव केल्याप्रकरणी कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे. अशा प्रकारे कोणी गैरकृत्य करेल त्याचेवर कठोर कारवाई करण्यात येईल.

सदरची कारवाई मा. पोलीस अधिक्षक सो, समीर शेख, मा. अप्पर पोलीस अधिक्षक श्रीमती आंचल दलाल, मा.उप.वि. पोलीस अधिकारी साो, किरणकुमार सुर्यवंशी, मा. वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री. महेंद्र जगताप, पोलीस निरीक्षक श्री. संदीप जगताप यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहा. पोलीस निरीक्षक श्री. अविनाश माने, पोलीस उपनिरीक्षक श्री. सुधीर मोरे, पो.हवा. सुजित भोसले, निलेश जाधव, पो.ना. पंकज मोहिते पो.कॉ. संतोष कचरे, गणेश घाडगे, संतोष घाडगे, मच्छिंद्रनाथ माने, सचिन रिटे, इरफान मुलाणी, सुशांत कदम यांनी केलेली आहे.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट