उल्हासनगर मध्ये अति उल्लेखनीय कामगिरी केलेल्या पोलीस अंमलदारांचा महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेतर्फे विशेष सत्कार…..

उपसंपादक-रणजित मस्के
ठाणे :

महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना स्थापन होऊन ६ वर्षे पूर्ण झाली. पोलीस अधिकारी, कर्मचारी, सामान्य जनता यांच्या न्याय हक्कासाठी लढा देण्याचे काम महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेच्या माध्यमातून करण्यात येते. या ६ वर्षात महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेचे काम हे आतापर्यंत ३२ जिल्ह्यांमध्ये पोहोचलेले आहे. मा. श्री. राहुलजी दुबाले साहेब (महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना, संस्थापक अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य) यांच्या अध्यक्षतेखाली तथा आदेशानुसार ठाणे जिल्ह्यात महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना ठाणे जिल्हा टीम ही एकजुटीने संघटित होऊन संघटनात्मक कामगिरी करत असते.
महाराष्ट्र राज्यातील आपल्या महाराष्ट्र पोलिसांची राज्यातील प्रत्येक तालुक्यांतील, जिल्ह्यांतील अनेक वेगवेगळ्या ठिकाणी आपल्या जीवाची पर्वा न करता अविश्वसनीय अशी कामगिरी करताना आपण बघत आहोत. आपल्या ठाणे जिल्हा मधील ठाणे शहर पोलीस यांनी सुद्धा आपल्या जीवाची पर्वा न करता अनेक अविश्वसनीय कामगिरी केलेली आहेत. उल्हासनगर मध्यवर्ती पोलीस स्टेशन येथे कार्यरत असलेले पोलीस अंमलदार श्री. सचिन लहानु वरठा तसेच पोलीस अंमलदार श्री. वसंत रमेश लाखन या दोन्ही जिगरबाज पोलीस अंमलदारांनी चोरीला गेलेले १०२ मोबाईल अत्यंत कमी कालावधीत म्हणजे एक महिन्याच्या आतमध्ये शोधून नागरिकांना मोबाईल सुपूर्त केले. दोन्ही पोलीस अंमलदारांच्या या धडाकेबाज कामगिरीमुळे महाराष्ट्रातील तमाम पोलिसांची मान उंचावलेली आहे.


याबद्दल महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना तसेच महाराष्ट्रातील तमाम पोलीस परिवार यांच्या वतीने दोन्ही पोलीस अंमलदारांचा सत्कार करण्यात आला. यावेळी महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेतील असंख्य पदाधिकारी व सदस्य तसेच पोलीस परिवार उपस्थित होते.अशी माहिती
उमेश गोवर्धन भारती ठाणे जिल्हा अध्यक्ष महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना यांनी दिली.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com