कराड तालुका गुन्हे अन्वेषण शाखेतील पोलीसांची कारवाई शिंदेवाडीतील दरोडयाचा गुन्हा 72 तासांत उघडकीस आणुन पाच आरोपींना अटक…

0
Spread the love

उपसंपादक – रणजित मस्के

कराड : कराड तालुका पोलीस ठाणे गु.र.नं.41/2023 भा.द.वि.स. कलम 392,341, 427, 34 मधीत फिर्यादी श्री. उमेश रघुनाथ खबाले वय 51 वर्षे व्यसवाय खड़ी क्रेशर विक्री रा. विंग ता. करा जि.सातारा हे दिनांक 27.01.2023 रोजी रात्रौ 08.20 वा.चे. सुमारास त्याचे श्री. दत्त गुरु स्टोन क्रेशरवर दिवसभर झालेल्या व्यवहाराची रक्कम 2,02,000/- ही पिशवीत घेवुन त्याची बोलेरो जीप क्रमांक एम.एच.50.जे.6037 ने घरी जात असताना अज्ञात इसमांनी त्यांना शिंदेवाडी, ता. कराड गावाजवळ आडवुन त्यांना धाक दाखवुन पैशाची पिशवी जबरदस्तीने हिसकावुन घेवुन पळुन गेले होते. म्हणुन वगैरे मजकुरचे खबरीवरुन गुन्हा रजिस्टरी दाखल करणेत आलेला होता. सदर गुन्हयाचा तपास मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. डॉ. रणजीत पाटील हे करत आहेत.

मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. डॉ. रणजीत पाटील सो, कराड व पोलीस निरीक्षक श्री आनंदराव खोबरे सो, कराड तालुका पोलीस ठाणे यांनी आरोपीत यांचा शोध घेवुन गुन्हा उघडकीस आणणेकामी सहा.पोलीस निरीक्षक अली अहमद मुल्ला यांचे अधिपत्याखाली एक पथक तयार करुन त्यांना योग्य त्या सुचना व मार्गदर्शन केले.

सदर पथकाने सी. सी. टीव्ही फुटेज व तांत्रिक तपासाचे आधारे प्रत्यक्ष पुरावा नसतांना देखील बारामती, वालचंदनगर जि.पुणे या परीसरातुन सदर गुन्हयातील 5 आरोपीत यांना ताब्यात घेवुन त्यांचेकडे गुन्हयाचे अनुषंगाने विचारपुस केली असता त्यांनी सदर गुन्हा केल्याचे कबुल केले तसेच त्याचा गुन्हयातील सहभाग निष्पन्न झाल्याने त्यांना ताब्यात घेवुन पोलीस ठाणेत आणुन अटक करण्यात आली. सर्व आरोपीत यांना मा. न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना मा. न्यायालयाने दिनांक 03.02.2023 रोजी पावेतो पोलीस कोठडी मंजुर करण्यात आलेली आहे.

वरील कामगिरी मा. पोलीस अधिक्षक श्री. समीर शेख सो, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. बापू बांगर सो, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. डॉ. रणजीत पाटील सो, कराड व पोलीस निरीक्षक श्री आनंदराव खोबरे सो, कराड तालुका पोलीस ठाणे यांचे मार्गदर्शनाखाली कराड तालुका पोलीस स्टेशन गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहा. पोलीस निरीक्षक श्री. अली अहमद मुल्ला, पो. हवा. महेश लावंड, पो. हवा. उत्तम कोळी, पो. ना. सज्जन जगताप, पो.ना. सचिन निकम, पो.ना. सचिन सांळुखे यांनी केली आहे.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः

मोबा.नं. 9920601001

info@surakshapolicetimes.com

diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट