पोलादपूरात चोळईत आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन एका १९ वर्षीय तरुणाची आत्महत्या..!

उपसंपादक -राकेश देशमुख
पोलादपूर :– पोलादपूर शहरापासून जवळच चोळई नवीन वसाहत येथे वरून शांताराम गायकवाड या १९ वर्षीय तरुणाने दारूच्या नशेत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.
मयत वरून शांताराम गायकवाड या तरुणाने रविवार रोजी सकाळी ११ वाजण्यापूर्वी नक्की वेळ माहित नाही चोळई नवीन वसाहत येथील एका आंब्याच्या झाडाला कपड्यांच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. मयत वरून गायकवाड यांनी दारूच्या नशेत आत्महत्या केली असावी असा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे.
या घटनेची माहिती समजतात पोलादपूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री. अनिल जाधव, पोलीस उपनिरीक्षक श्री .अक्षय मांदळे, सहाय्यक फौजदार श्री भाऊराव शिंगणकर,पो हे.को.तुषार सुतार, आदींनी घटनास्थळी धाव घेऊन घटनास्थळाचा पंचनामा केला असून या घटनेची नोंद पोलादपूर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.


ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com