पोलादपूरात आरोपी ज्ञानेश्वर उतेकर यास धारदार सुरा विना परवाना बाळगल्याबद्दल गुन्हा दाखल…

उपसंपादक-राकेश देशमुख
पोलादपूर: – बुधवार दिनांक 18 ऑक्टोबर 2023 रोजी रात्री 09 : 30 वाजताच्या सुमारास मौजे तुर्भे गावच्या हद्दीत कुंभार डोह या नावाने ओळखल्या जाणाऱ्या नदिचे पुढील सार्वजनिक रोडवर ता.पोलादपूर, जि.रायगड येथे आरोपी ज्ञानेश्वर कृष्णा उतेकर वय 40 वर्षे हा त्याच्या ताब्यात विना परवाना धारदार शस्त्र बाळगल्या स्थितीत सार्वजनिक ठिकाणी शांतता भंग करून मा.जिल्हाधिकारी सो.रायगड अलिबाग अधिसूचना आदेशाचे उल्लंघन करून मिळून आला.

फिर्यादी श्री. विनोद विठोबा महाडीक पोलीस नाईक नेमणूक पोलादपूर पोलीस ठाणे यांनी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार उपविभागीय पोलीस अधिक्षक महाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलादपूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक श्री. म्हस्कर यांनी तात्काळ घटनास्थळी भेट दिली आणि आरोपीस अटक करुन त्याच्या विरोधात पोलादपूर पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधान कलम शस्त्र अधिनियम 1959 चे कलम 4,25 सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37(1),(3)/13,5,110,112/11,7 प्रमाणे गुन्हा दाखल केला असून याबाबतचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक श्री. धुमासकर करीत आहेत.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com