पोलादपूर येथील तरुणाचा महाड येथे मुंबई-गोवा हायवेवर मोठा अपघात-midc पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल…

प्रतिनिधी-रेश्मा माने
महाड : दिनांक 24 नोव्हेंबर 2021 रोजी सकाळी 10 च्या सुमारास सर्वेश विश्वनाथ कळंबे वय 20 वर्षे रहाणार उमरठ ता.पोलादपूर याचा मुंबई गोवा हायवेवर मोजे इसाने कांबळे गावचे हद्दीतील हॉटेल एस फुड पार्कचे समोर ता.महाड जि. रायगड येथे अपघात होवुन जागीच मृत्यू झाला.
यांतील खबर देणार 1) राहुल अशोक उतेकर 2) अविनाश दिपक गोळे व 3) सिध्देश राजेंद्र नरे हे स्वत: त्यांचे ताब्यातील होंडा शाईन मोटार सायकल क.एम.एच.०६सी.इ.७७६२ ही घेवुन पोलादपुर कडुन नांगलवाडी कडे जात असताना त्यांचे पाठीमागुन येणारी होंडा स्प्लेडर मोटार सायकल क.एम.एच.०६बी.एक्स ०९२० हीची होंडा शाईन मोटार सायकल क.एम.एच.०६सी.इ.७७६२ हिचे उजवे बाजुला ठोकर लागुन सदरची मोटार सायकल मुंबई बाजुकडुन येणारी इनोव्हा कार नं.एम.एच.४७ ए.बी.७३७७ हिवर धडकुन अपघात होवुन अपघातात जखमी नं.१. राहुल अशोक उतेकर २. अविनाश दिपक गोळे ३. सिध्देश राजेंद्र नरे यांना लहान मोठया दुखापती होवुन मोटार सायकल क.एम.एच.०६बी.एक्स ०९२० ही वरील चालक सर्वेश विश्वनाथ कळंबे हा मयत झाला म्हणुन जवळील महाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास एमआयडीसी पोलीस ठाण्याचे मपोना.श्री. उमरठकर व सपोनि. श्री. खाडे साहेब करीत आहेत.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
dipakbhogal@surakshapolicetimes.com