प्रवासादरम्यान पडलेली पर्स परत करणाऱ्या व्यक्तींचे पोलादपुर पोलीसांकडुन कौतुकांचा वर्षांव…

0
Spread the love

प्रतिनिधी-किशोर किर्वे

बुधवार दिनांक 16 फेब्रुवारी 2022 रोजी दुपारच्या सुमारास भाग्यश्री शिंदे रा.कापडे,ता .महाड, जि.रायगड यांची कापडे ते पोलादपूर प्रवासादरम्यान पर्स पडली होती.

या पर्समध्ये भाग्यश्री शिंदे यांची महत्वाची कागदपत्रे व बँकेची ATM card व रोख रक्कम होती.

ही पर्स कापडे ते पोलादपूर रस्त्यावरुन प्रवास करणारे श्री. तुकाराम गोपाळ सकपाळ व श्री. भिकण धोंडीबा जाधव दोघे रहाणार पार,प्रतापगड हे महाड वरून प्रतापगड ला मोटारसायकल ने प्रवास करित असताना त्यांना भेटली असता त्यांनी ती पर्स पोलादपूर पोलीस ठाणे येथे आणून जमा केली असता पोलादपूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. पी.आर.जाधव यांनी दिलेल्या आदेशानुसार पोलादपूरचे पोलीस हवालदार श्री. शिरगावकर यांनी याबाबतचा तपास करून भाग्यश्री शिंदे रा. कापडे यांना पोलीस ठाण्यात बोलावून त्यांना त्याची पर्स सुरक्षितपणे परत केली आणि श्री. तुकाराम सकपाळ व श्री. भिकण जाधव या दोन्ही व्यक्तींचा पोलीसांनी व भाग्यश्री शिंदे यांनी त्यांचा प्रामाणिकपणा बघून त्यांचे आभार मानुन कौतुकही केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट