पोलादपूर पोलीस ठाणे तर्फे हळदी कुंकू समारंभानिमित्त तुळशीवृक्ष वाटप…

0
Spread the love

उपसंपादक : राकेश देशमुख

महाड :– महाराष्ट्र पोलीसांच्या ‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’ ह्या ब्रीद वाक्याप्रमाणे वर्षाचे ३६५ दिवस पोलीस बांधव जन सामान्यांची सेवा करीत असतात.

पोलीस बांधवांच्या सेवेमुळेच सामान्य नागरिक प्रत्येक सण उत्साहात आणि आनंदात साजरा करतो. तालुक्यातील गावा खेड्यांत प्रजासत्ताक दिनी २६ जानेवारी रोजी हळदीकुंकू व इतर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.

पोलादपूर पोलीस ठाणे येथे २८ जानेवारी २०२४ रोजी पोलादपूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. युवराज म्हसकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलादपूर पोलीस ठाण्याच्या प्रांगणात महिलांसाठी हळदीकुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.

हळदीकुंकू समारंभाला पोलादपूर शहरातील व ग्रामीण भागातील महिलांनी उपस्थिती लावली.
हळदीकुंकू समारंभासाठी उपस्थित महिलांना पोलादपूर पोलीस ठाण्याच्या पोलीस हवालदार श्रीमती जयश्री सर्णेकर, पोलीस हवालदार ऋतुजा पवार, महिला कॉन्स्टेबल झेंडे, भुरके, चव्हाण यांनी हिंदू धर्मात पवित्र समजल्या जाणाऱ्या तुळशी वृक्षाचे वाटप यावेळी केले.

हळदीकुंकू समारंभातून निसर्गाचे व पर्यावरणाचे महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न यावेळी पोलादपूर पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांकडून करण्यात आला. पोलादपूर पोलीस ठाणे यांनी राबविलेल्या स्तुत्य उपक्रमाचे विभागातील असंख्य नागरिकांकडून कौतुक करण्यात येत आहे.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः

मोबा.नं. 9920601001

info@surakshapolicetimes.com

diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट