गोवंश कत्तली साठी गुरांची बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्यांवर पोलादपूर पोलीसांची कारवाई.…

उपसंपादक-राकेश देशमुख
महाड :-गो तस्करी रोखण्यात पोलादपूरच्या गोरक्षकांना पुन्हा यश.
महाड तालुक्यातील ईसाने कांबळे गावात घडलेल्या गोवंश हत्त्या प्रकरणानंतर महाड पोलादपूर तालुक्यात गोवंश हत्त्या तसेच गो तस्करी काही दिवस बंद होती, मात्र शुक्रवार दिनांक ९ आॕगस्ट रोजी रात्री साडे अकरा वाजताच्या सुमारास पोलादपूर तालुक्यातील कापडे नाक्यावर पोलादपूर पोलीसांनी व गोरक्षकांनी केलेल्या कारवाईनंतर पोलादपूर तालुक्यात गो तस्करी सुरूच असल्याचे समोर आले आहे, शुक्रवारी रात्री पोलादपूर तालुक्यातील कापडे नाक्यावरून होणारी गोवंश तस्करी पोलादपूरच्या गोरक्षकांनी आपल्या जीवाची बाजी लावत रोखली आहे, पोलादपूर पोलीसांनी बोलेरो पिक अप क्रमांक एम एच ८ ऐ पी ५३५२ या गाडीसह गाडीतील चार गायी, एक कालवट व एक वासरू ताब्यात घेऊन जावेद वालवटकर वय वर्षे ५८ राहणार विहुप तालुका मुरुड या एका आरोपीस अटक केले आहे पोलादपूर पोलीस ठाण्यात गो तस्करी करणाऱ्या एकुण १३ आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आले असून यात प्रामुख्याने गोवंश विक्री करणाऱ्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात आले आहेत.







मंगेश शिवराम खेडेकर वय वर्षे ३७ राहणार चाळीचा कोंड बोरावले तालुका पोलादपूर याच्यावर गोवंश कत्तलीसाठी विक्री केल्याने गुन्हा दाखल करण्यात आले आहे, अधिक तपास पोलादपूर पोलीस करीत आहेत.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com