पो स्टे कुन्हा हद्दीत अवैद्य गोवंश वाहतुक करणाऱ्यांवर अमरावती विशेष पथकाची धडक कार्यवाही..

0
Spread the love

सह संपादक -रणजित मस्के

अमरावती

अमरावती ग्रामिण जिल्हयात अवैद्य गोवंश वाहतुक व विक्रीला आळा घालण्याकरीता तसंच त्यांचा ममुळ नाश करणे बाबत मा. विशाल आनंद पोलीस अधिक्षक अमरावती ग्रामिण यांनी यापुर्वीच अधिनस्त मर्व पोलीम अधिकारी व अंमलदार यांना आदेशित केलेले आहे.


दिनांक ०५/०५/२०२५ रोजी मिळालेल्या गोपनिय माहीतीदार यांने स्थानिक गुन्हे शाखा चे विशेष पथकाम माहीती दिली की, एक इनोव्हा वाहन गोवंश भरण्याकरीता आर्वी जिल्हा वर्धा येथे गेले आहेत. अशा माहीनोवरून विशेष पथक पोलीस स्टेशन कुन्हा हददीमध्ये ग्राम कौडण्यपुर ते मार्डा रोड वर नाकाबंदी करीता हजर असताना दिवस उजाडल्या नंतर वरील नमुद वाहन आले असता स्था.गु.शा.चे पथकाने समोर असलेले इनोव्हा वाहन थांबवण्याचा प्रयत्न केला असता वाहनातील आरोपी हे वाहन घेवून पळून गेले. त्यांचा पाठलाग केला असता सदर वाहनातील चालक व क्लिनर वाहन सोडून पळाले. त्या दोघांचा अंदाजे १-२ किमी पाठलाग करून दोन्ही आरोपींना पकडण्यात पथकास यश आले. तसेच सदर इनोव्हा वाहन क्र एम एच ३१ सो एन ८७१९ यांची आरोपी ममक्ष पाहणी केली असता त्यामध्ये ०९ गोवंश मिळून आले. तसेच आरोपी यांना त्यांचे नाव गाव विचारले असता त्यांनी त्यांचे नाव १. शेख रेहान शेख हयाद कुरेशी वय २० वर्षे रा. अन्सार नगर अमरावती, २. शेख रिजवान शेख रफिक वय २५ वर्षे रा. नागपुरी गेट अमरावती असे असल्याचे सांगितले. ताब्यातील आरोपीतांना सविस्तर विचारपुस केली असता आरोपीतांनी सदर गोवंश वाहतुक हे इतर आरोपीच्या सांगण्यावरूण केले असल्याचे सांगीतले असल्याने इतर ३ आरोपी फरार असुन त्यांचा शोध सुरू आहे. सदर गुन्हयात ९ गोवंश किमंत अंदाजे ६७,२०० रूपये व इनोव्हा वाहन क्र एम एच ३१ सी एन ८७१९ किमंत अंदाजे ३,००,००० रूपये असा एकुण ३,६७,००० रूपयाचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला. व ताब्यातील गोवंश गौरक्षण संस्था येथे सुरक्षा व निर्वाह करोता दाखल करण्यात आले. व आरोपी क्र १. शेख रेहान शेख हयाद कुरेशी वय २० वर्षे रा. अन्सार नगर अमरावती, २. शेख रिजवान शेख रफिक वय २५ वर्षे रा. नागपुरी गेट अमरावती व उर्वरीत फरार ३ आरोपी यांचे विरूध्द पोलोस स्टेशन कुन्हा येथे अप क्र २००/२५ कलम ३२५ बि.एन.एस. सहकलम ११(१) (D), ५(A) (१) प्राण्याचा छळ प्रतिबंधक अधिनयम १९६० सहकलम ९ महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम १९७६ सहकलम ८३१७७ महाराष्ट्र मोटार वाहन अर्धािनयम १९८९ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.

सदरची कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक श्री पंकज कुमावत (भा.पो.से.) यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा प्रमुख पोलीस निरीक्षक किरण वानखडे यांचे नेतृत्वात विशेष पथक प्रमुख पोउपनि गणेश शिदे व त्यांचे पथकाने केलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट