विमानतळ पोलीसांनी सराईत गुन्हेगाराकडुन केल्या दोन दुचाकी केल्या जप्त

सह संपादक – रणजित मस्के
पुणे
विमानतळ पोलीस स्टेशन

दिनांक ०५/०५/२०२५ रोजी विमानतळ पोलीस स्टेशनचे हद्दीमध्ये पेट्रोलिंग करीत असताना विमानतळ पोलीस ठाणेचे तपास पथकातील कर्मचारी योगेश थोपटे यांना त्यांचे गोपनिय बातमी दारामार्फत बातमी मिळाली की, लोहगाव येथुन एका इसमाने दुचाकी वाहन चोरी केलेली असुन सदर इसम हा सध्या चोरलेल्या दुचाकीसह आर के चौकासमोरील मोकळे मैदानामध्ये थांबलेला आहे. सदरची बातमी तपास पथकाचे प्रभारी श्री. विजय चंदन, सहा. पोलीस निरीक्षक यांना कळविली, त्याप्रमाणे स्टाफचे मदतीने विमानतळ तपास पथकाने सापळा रचुन चोरीची दुचाकी व त्यावरील इसम नामे १) मुनान सत्तार अन्सारी वय ३४ वर्षे रा. जेजे इंग्लीश मिडीयम शाळेशेजारी, कलवड वस्ती लोहगाव पुणे यास ताब्यात घेतले होते. त्यांचेकडे असलेल्या अॅक्टीव्हा दुचाकी बाबत विमानतळ पोलीस स्टेशन पुणे शहर येथे अभिलेखाची माहिती घेतली असता, विमानतळ पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर २०२/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम ३०३ (२) प्रमाणे गुन्हा दाखल असल्याचे निष्पन्न झाले. नमुद आरोपीकडे अधिक तपास केला असता त्याचेकडे एक बुलेट मिळुन आली असुन सदर बुलेटबाबत अधिक माहिती घेतली असता ती काळाचौकी पोलीस ठाणे मुंबई शहर येथुन चोरी केल्याचे निष्पन्न झाले आहे. अशाप्रकारे नमुद आरोपीताकडुन दोन गुन्हे उघडकीस आले असुन त्याचेकडुन एकुण १,८०,०००/-रु (एक लाख ऐंशी हजार) किंमतीच्या दोन दुचाकी मोटार सायकल हस्तगत करण्यात आल्या आहेत.
सदरची कारवाई ही मा. श्री. मनोज पाटील अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग पुणे शहर, मा. श्री. हिंमत जाधव, पोलीस उपायुक्त परि-०४ पुणे शहर, श्रीमती प्रांजली सोनवणे सहा. पोलीस आयुक्त, येरवडा विभाग पुणे शहर, यांचे आदेशान्वये अजय संकेश्वरी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, विमानतळ पोलीस स्टेशन पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली श्रीमती आशालता खापरे, पोलीस निरीक्षक (गुन्हे), सहा. पोलीस निरीक्षक श्री. विजय चंदन, पोलीस कर्मचारी रुपेश पिसाळ, शैलेश नाईक, राकेश चांदेकर, अंकुश जोगदंडे, योगेश थोपटे, दादासाहेब बर्डे, ज्ञानदेव आवारी, हरीप्रसाद पुंडे, लालु कन्डे, गिरीष नाणेकर, रुपेश तोडेकर यांचे पथकाने केली आहे.