पिस्टलचा धाक दाखवुन, व्यापाऱ्याचे अपहरण करुन ५० लाखाची खंडणी मागणारे २ अट्टल गुन्हेगार मुद्देमालासह स्था. गुन्हे शाखा जालना यांनी केले जप्त..

सह संपादक -रणजित मस्के
जालना


दिनांक 29/06/2025 रोजी तक्रारदार नामे चंदन बसंतीलाल गोलेच्छा वय 49 वर्ष व्यवसाय किराणा दुकान रा.आस्था होटेलच्या बाजुला जालना यांना पिस्टलचा धाक दाखवुन, तुझी सुपारी मिळाली आहे. तुला जीव वाचवायचा असेल तर 50 लाख द्यावे लागेल असे म्हणून, त्यांचे अपहरण करुन आरोपीनी 04 लाख रुपये घेवून गेले होते. तक्रारदार यांनी दिनांक 30/06/2025 रोजी दिलेल्या तक्रारी वरुन पोलीस ठाणे सदर बाजार गुरनं. 464/2025 कलम 308(5),140,(2),352,351(2),3(5) भा.न्या.सं.प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला होता.
मा. पोलीस अधीक्षक, जालना व अपर पोलीस अधीक्षक, जालना यांनी सदर गुन्हयातील आरोपींचा शोध घेवून आरोपी अटक करणे बाबत सुचना दिल्या होत्या. त्यावरुन स्थानिक गुन्हे शाखेचे पथक आरोपींचा शोध घेत होते. परंतु आरोपींनी त्यांचे वापरात असलेले मोबाईल बंद करुन फरार झाले होते.
दिनांक 05/07/2025 रोजी गुन्हयातील आरोपी अक्षय रविंद्र गाडेकर व विठ्ठल भिमराव अंभोरे असे दोघेजण एका काळ्या रंगाचे स्प्लेंडर मोटारसायकलसह विशाल कॉर्नर जालना येथे बायपास रोडवर धांवलेले आहे अशी माहिती प्राप्त झाली. त्यावरुन स्थानिक गुन्हे शाखेचे पथक आरोपीकडे जात असतांना दोन्ही आरोपींना संशय आल्याने त्यांनी मोटारसायकल जागेवर सोडुन शेतात पळ काढला, पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी दोन्ही आरोपींचा एक ते दीड किलोमीटर पाठलाग करुन त्यांना शिताफीने पकडले आहे.
आरोपी नामे 1) अक्षय रविंद्र गाडेकर बय 22 वर्ष रा. पिंपळगाव शेरमूलकी ता.भोकरदन जि. जालना 2) विठ्ठल भिमराव अंभोरे वय 25 वर्ष रा. व्दारकानगर जालना यांना गुन्हयाचे अनुषंगाने विचारपुस केली असता दोन्ही आरोपी व त्यांचा एक साथीदार 3) राहुल रत्नाकर गंगावणे रा. चांधई एक्को ता. भोकरदन असे तिघांनी चंदन गोलेच्छा यांचे अपहरण करून पिस्टलचा धाक दाखवुन त्यांचेकडुन 04 लाख रुपये खंडणी घेतली असल्याचे कबुल केले आहे. दोन्ही आरोपोंच्य ताब्यातुन गावठी बनावटीचे 01 पिस्टल, रोख 77000/- रु., एक स्प्लेंडर मो.सा.03 मोबाईल असा एकूण 2,10,000/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
सदरची कारवाई श्री. अजयकुमार बंसल, पोलीस अधीक्षक जालना श्री. आयुष नोपाणी, अपर पोलीस अधीक्षक जालना श्री. अनंत कुलकर्णी उपविभागीय पोलीस अधिकारी जालना यांचे मार्गदर्शनाखाली पो.नि.श्री.पंकज जाधव, सपोनि श्री.योगेश उबाळे, जगदीश बावणे, रुस्तुम जैवाळ, कैलास खाडे, दिपक घुगे, सागर बाविस्कर, किशोर पुंगळे, सचीन राऊत, धिरज भोसले, अशोक जाधबर (चालक) सर्व स्थानिक गुन्हे शाखा जालना यांनी केली आहे.