पिस्टल बाळगणाऱ्या इसमास आंबेगाव स्टेशन पुणे शहर पोलीसानी ठोकल्या बेड्या..

0
Spread the love

पुणे :

उपसंपादक-उमेद सुतार

पोलीस आयुक्त साो, पुणे शहर यांनी पुणे शहरातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी कोबींग ऑपरेशन व गुन्हे प्रतिबंधक चे अनुषंगाने गस्त करणेबाबत आदेशीत केले होते. त्याअनुषंगाने आंबेगाव पोलीस स्टेशनचे हददीत मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद झिने यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी प्रियंका गोरे हे तपास पथकासह असे दत्तनगर परीसरात गस्त करीत असताना पोलीस अंमलदार धनाजी धोत्रे व निलेश जमदाडे यांना खास बातमीदामार्फत माहिती मिळाली की, “आई श्री व्हीला अपार्टमेंटचे बाजुला एका गाईच्या गोठ्यामध्ये एक इसम अंगात काळ्या रंगाचा गोल गळयाचा हा टी शर्ट व काळी ट्रक पॅन्ट, अंगाने मजबुत असलेल्या इसमाकडे पिस्टल आहे.” वरील बातमीप्रमाणे माहिती मिळताच सदर ठिकाणी सापळा रचण्यात आला. काही वेळातच बातमी प्रमाणे सदर ठिकाणी एक इसम मिळुन आला असता त्यास ताब्यात घेण्यात आले.

ताब्यात घेतलेल्या इसमाचे नावेः-

१) आर्यन बापू बेलदरे, वय १९ वर्षे, काम शिक्षण, रा. आई श्री व्हीला अर्पाटमेंन्ट, फलॅट नंबर ३०४, तिसरा मजला, स्मशान भुमी समोर, आंबेगाव ब्रु, पुणे

सदर इसमांचे ताब्यात एकुण रु.४०,१००/- रुपये किंमतीचा एक पिस्टल व एक जिवंत राउंडसह अनाधिकाराने, बेकायदेशीररित्या गुन्हा करण्याचे उद्देशाने विक्री करीता बाळगल्याने मिळुन आले आहे. म्हणुन त्यांचे विरुध्द भारती विद्यापीठ पो स्टे, गुन्हा रजि नं. १०५७/२०२४ भारतीय हत्याराचा अधिनियम कलम ३ सह २५ महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७ (१) (३) सह १३५, अन्वये गुन्हा दाखल केला असुन त्यामध्ये वर नमुद इसमास अटक केली आहे.

सदरची कामगिरी अमितेश कुमार पोलीस आयुक्त साो, पुणे शहर, रंजनकुमार शर्मा साो, पोलीस सह आयुक्त, पुणे शहर, प्रविणकुमार पाटील साो, अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशीक विभाग पुणे शहर, स्मार्तना पाटील साो, पोलीस उपआयुक्त साो, परिमंडळ-२ पुणे शहर, राहुल आवारे, सहाय्यक पोलीस आयुक्त साो, स्वारगेट विभाग, पुणे यांचे मार्गदर्शनाखाली आंबेगाव पोलीस स्टेशनकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद झिने, प्रियंका गोरे सपोनि, पोलीस अंमलदार शैलेंद्र साठे, हनमंत मासाळ, निलेश जमदाडे, धनाजी धोत्रे, प्रमोद भोसले, योगेश जगदाळे, विनायक पाडळे यांचे पथकाने केली.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट