पींपरी चिंचवड पोलीसानी मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाकडून तडीपार आरोपीस ताब्यात घेऊन घरफोडीचे व वाहन चोरीचे गुन्हे केले उघड..

उपसंपादक-रणजित मस्के
पिंपरी चिंचवड:-
१,८०,०००/- रु मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
पोलीस आयुक्तालय पिंपरी-चिंचवड
मालमत्ता गुन्हे
दिनाक ११/१२/२०२४. मा. पोलीस आयुक्त श्री. विनयकुमार चौबे साो. यांनी पिंपरी चिंचवड आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये दरोडा, जबरी चोरी, घरफोडी व वाहन चौरी करणारे गुन्हेगारांची बातमी प्राप्त करुन त्यांचे विरुध्द कडक कार्यवाही करणेबाबत आदेश दिलेले होते. त्यानुसार आमचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेकडील मालमत्ता गुन्हें विरोधी पथकातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ, अधिकारी व अंमलदार हे दरोडा, जबरी चोरी, घरफोडी चोरी, व वाहन चोरी करणाऱ्या इसमांची गोपनीय बातमी प्राप्त करीत होते. तेव्हा पोलीस अंमलदार १३०४ जायभाय यांना त्यांचे बातमीदारांकडुन माहिती। प्राप्त झाली की, एक तडीपार आरोपी चोरीचे मोबाईल विक्री करीता आंळदी फाटा चाकण येथे येणार आहे.
सदर मिळालेल्या बातमीच्या अनुशंगाने पोलीस उप निरीक्षक गोसावी, सपोफी गवारे, पोहवा १०६२ हिंगे, पोहवा १४५८ बनकर, पोहवा ३२०८ विशाल गायकवाड, पोहवा १०२३ तांबोळी, पोशि १३०४ जायभाय, पोशि २१८४ आत्तार यांनी बातमीच्या ठिकाणी जावुन मोठया शिताफीने अभिलेखावरील तडीपार आरोपी नामे अभिजीत सुभाष रॉय वय २५ वर्षे, रा दत्ता काका साने बिल्डींग, वाघु साने चौक, चिखली पुणे. मुळगाव राघवपुरराम, ठाणा रानाघाट, जि. नदीया,। पश्चिम बंगाल यास सापळा लावुन ताब्यात घेवुन त्याची अंगझडती घेतली असता त्याचे ताब्यात एक चोरीची मोटार सायकल व चोरीचे मोबाईल फोन मिळुन आले.

सदर तडीपार आरोपी कडे सखेल चौकशी करता त्याने घरफोडीचे ०५ गुन्हे केल्याचे तसेच वाहन चोरीचा ०१ गुन्हा केल्याचे उघड झाले आहे. तपासादरम्यान आरोपींकडुन ०१ मोटार सायकल व ०६ वेगवेगळया कंपन्याचे मोबाईल असा एकुण १,८०,०००/- रू किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ८९९ / २०२४ आरोपींकडुन अदयाप पर्यंत खालील ०६ गुन्हे उघडकीस आले आहेत. १) चाकण पोलीस स्टेशन, पिं चि गुन्हा रजिस्टर नंबर भा. न्या. सं. क. ३०३ (२) प्रमाणे २) चाकण पोलीस स्टेशन, पिं चि गुन्हा रजिस्टर नंबर ४६५ / २०२४ भा. न्या.सं.क. ३३१ (४), ३०५ प्रमाणे ३) भोसरी पोलीस स्टेशन, पिं .चि. गुन्हा रजिस्टर नंबर ४८२ / २०२४ भा.न्या.सं.क. ३०५ (अ), ३३१ (४) प्रमाणे ४) दिघी पोलीस स्टेशन, पिं चि गुन्हा रजिस्टर नंबर ५३२ / २०२४ भा. न्या. सं. क. ३०५, ३३१ (४) प्रमाणे ५) चिखली पोलीस स्टेशन, पिं चि गुन्हा रजिस्टर नंबर ४३० / २०२४ भा. न्या. सं. क. ३०५,३३२ (३), ३३२ (४) प्रमाणे ६) तोफखाना पोलीस स्टेशन अहमदनगर गुन्हा रजिनं १२८६ /
२०२४ भा.न्या.सं.क. ३०५ (२), ३३१ (४) प्रमाणे तसेच सदर आरोपीस मा पोलीस उप आयुक्त सो परिमंडळ ३ यांनी तडीपार केले असताना तो पिपंरी चिचवड आयुक्तालयात चाकण पोलीस ठाणे हद्दीत मिळुन आल्याने त्याचे विरुध्द चाकण पोलीस ठाणे गु. रजि.नं ९०२/२०२४ म.पो.का कलम १४२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर तडीपार आरोपी अभिजीत सुभाष रॉय हा पिपंरी चिचवड आयुक्तालयातील अभिलेखा वरील सराईत गुन्हेगार असून त्याचे विरुध्द घरफोडी व वाहन चोरी अश्याप्रकारचे पिं.चि. व पुणे शहर आयुक्तालयाच्या अभिलेखावर यापूर्वी एकुण १९ गुन्हे दाखल आहेत. सदया स्थीतीत सदर आरोपीस पुढील तपासकामी चाकण पोलीस ठाणे गु. रजि. नं ८९९/ २०२४ भा. न्या. सं कलम ३०३ (२) या गुन्हयात अटक करण्यात आलेली असुन तो चाकण पोलीस ठाणे याचे ताब्यात आहे. त्याचे कडे आणखी गुन्हे उघडकीस आणण्याचे दृष्टीने तपास चालु आहे. सदर उल्लेखनीय कामगिरी ही मा. पोलीस आयुक्त श्री. विनयकुमार चौबे साो. पिंपरी चिंचवड, मा. श्री. शशिकांत महावरकर साो सह पोलीस आयुक्त, मा. श्री. वसंत परदेशी साो, अपर पोलीस आयुक्त, मा. संदीप डोईफोडे साो पोलीस उप-आयुक्त, गुन्हे, मा. डॉ. विशाल हिरे साो सहायक पोलीस आयुक्त, गुन्हे यांच्या मार्गदर्शनाखाली मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ, सहा पोलीस निरीक्षक अभिनय पवार, पोलीस उप निरीक्षक भरत गोसावी, पोलीस अंमलदार संजय गवारे, गणेश हिंगे, जमीर तांबोळी, आशिष बनकर, विशाल गायकवाड, नितीन उमरजकर, मारुती जायभाय, मोहसीन आत्तार, यांनी केली आहे
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com