पिंपरी चिंचवड अंमली पदार्थ विरोधी पथकाने गांजा तस्करी करणारे ७ आरोपींकडुु १ कोटी ३१ लाखाचा गांजा केला जप्त…

0
Spread the love

उपसंपादक- राकेश देशमुख

पुणे :– पिंपरी चिंचवड शहरामध्ये चोरुन व लपूनछपुन होणारी अंमली पदार्थाची विक्री, साठवणुक व वाहतुकीस पुर्णपणे प्रतिबंध व्हावा करीता मा. पोलीस आयुक्त, श्री. विनय कुमार चौबे साो यांनी सुचना दिल्या होत्या त्यानुसार मा. पोलीस उप आयुक्त, गुन्हे, संदीप डोईफोडे साो व मा. सहाय्यक पोलीस आयुक्त, गुन्हे – १ श्री बाळासाहेब कोपनर सो व वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वैभव शिंगारे, अंमली पदार्थ विरोधी पथक, गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी व अंमलदार यांना सुचना दिल्या व मार्गदर्शन केले होते.

त्याप्रमाणे दि.१२/०१/२०२४ रोजी अंमली पदार्थ विरोधी पथकाकडील पोलीस अंमलदार सदानंद रुद्राक्षे व रणधीर माने यांना मिळालेल्या बातमीवरुन अंमली पदार्थ विरोधी पथकाने रावेत पोलीस स्टेशनचे हद्दीमध्ये म्हस्के वस्ती येथे बी. आर. टी. रोडचे कडेला इसम नामे

१) कृष्णा मारुती शिंदे, वय २७ वर्षे, रा. शिंदेवस्ती, शितपुर, ता. कर्जत, जि. अहमदनगर,

२) अक्षय बारकु मोरे, वय २९ वर्षे, रा. कान्होबा वस्ती, पाटेगाव, ता. कर्जत, जि. अहमदनगर व

३) हनुमंत भाऊसाहेब कदम, वय ३५ वर्षे, रा. कुसडगाव, एस.आर.पी.एफ. सेंटर जवळ, ता. जामखेड, जि. अहमदनगर यांना ताब्यात घेवुन त्यांचे ताब्यातुन एकुण ३०,५५,७००/- रू. किं. चा माल त्यामध्ये २५,६९,१००/- रुपये किंमतीचा २५ किलो ६९१ ग्रॅम गांजा, एक सफेद रंगाची शेवरोलेट क्रुझ कंपनीची कार नं. एमएच १४ सी. डब्ल्यु ०००७ ही कार, ०४ मोबाईल व १,६००/- रुपये रोख रक्कम असा माल जप्त केला.

त्यांनी सदरचा गांजा हा इसम नामे

देवी प्रसाद उर्फ देवा सिताराम डुकळे वय ३२ वर्षे रा. उंडेगाव ता. परांडा, जि. धाराशिव याचेकडुन आणला असुन सदरचा गांजा हा इसम नामे सौरव निर्मल, रा. रुपीनगर, चिखली, पुणे (पुर्ण नाव पत्ता माहीत नाही) यास विकणार असल्याचे सांगीतल्याने त्यांचे विरुध्द रावेत पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला.

त्यानंतर दाखल गुन्ह्याच्या तपासात पाहिजे आरोपी देवी प्रसाद उर्फ देवा सिताराम डुकळे वय ३२ वर्षे रा. उंडेगाव ता. परांडा, जि. धाराशिव याचे तांत्रिक विश्लेषणावरुन तो उंडेगाव ता. परांडा, जि. धाराशिव येथे असल्याची माहिती मिळाल्यावरुन त्यास उंडेगाव धाराशिव येथुन ताब्यात घेवुन त्याचे ताब्यातुन एकुण ५०,२०,००० /- रु. किं. चा ५० किलो २०० ग्रॅम गांजा हा अंमली पदार्थ मिळुन आल्याने जप्त केला आहे.

तसेच सदर गांजा हा इसम नामे सौरव निर्मल, रा. रुपीनगर, चिखली, पुणे यास विकण्यासाठी आणल्याने व सदर आरोपी अॅम्बुलन्समधुन गांजा वाहतुक करत असल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने सदर आरोपीस ताब्यात घेवुन त्याचे ताब्यातुन दोन अॅम्बुलन्स जप्त केल्या आहेत.

तसेच दि. १३/०१/२०२४ रोजी अंमली पदार्थ विरोधी पथकाकडील पोलीस अंमलदार विजय दौंडकर व प्रसाद कलाटे यांना मिळालेल्या बातमीवरुन अंमली पदार्थ विरोधी पथकाने म्हाळुंगे पोलीस स्टेशन हद्दीतील पुणे नाशिक हायवे रोड लगत, कुरुळी स्माशानभुमी ते अमर कांबळे यांची कात्रज दुध डेअरीकडे जाणा-या इंद्रायणी पार्क समोरील सर्व्हिस रोडवर कुरुळी ता.खेड जि.पुणे येथे इसम नामे

१) सन्नीदेवल सिध्दनाथ शर्मा वय २१ वर्षे रा. दिगंबर मोरे यांचे रुममध्ये अॅपेक्स गोडावुन समोर पुणे नाशिक हायवेलगत कुरुळी फाटा, कुरुळी ता.खेड जि.पुणे मुळगाव सराईगाढ ब्लॉक नगव रायपुर जि. सोनभद्र राज्य उत्तरप्रदेश व

२) सन्नीदेवल भगवानदास भारती वय २३ वर्षे रा. दिगंबर मोरे यांचे रुममध्ये अॅपेक्स गोडावुन समोर पुणे नाशिक हायवेलगत कुरुळी फाटा, कुरुळी ता.खेड जि.पुणे मुळगाव सराईगाढ ब्लॉक नगव रायपुर जि.सोनभद्र राज्य उत्तरप्रदेश यांना ताब्यात घेवुन त्यांचे ताब्यातुन एकुण २०,७९,६००/- रु. किं. चा माल त्यामध्ये २० किलो १९६ ग्रॅम वजनाचा गांजा हा अंमली पदार्थ व दोन मोबाईलसह जप्त केला आहे. त्यांनी सदरचा गांजा हा उत्तरप्रदेश येथुन राजेश कुमार रा. घोरावल जिल्हा सोनभद्र राज्य उत्तरप्रदेश याचेकडुन आणला आहे. म्हणुन त्यांचे विरुध्द म्हाळुंगे पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला आहे.
अशा प्रकारे एकाच दिवशी अंमली पदार्थ विरोधी पथकाने ०२ कारवाईमध्ये एकुण १,३१,५५,३००/- रु. किं.चा एकुण ९६ किलो ०८७ ग्रॅम गांजा हा अंमली पदार्थ, एक शेवरोलेट क्रुझ कंपनीची कार व दोन अॅम्ब्युलन्स जप्त करुन त्यातील माल देणारे व माल घेणारे आरोपींना ताब्यात घेवुन त्यांची साखळी नष्ट केली आहे.

सदरची कामगीरी ही मा. पोलीस आयुक्त, श्री. विनय कुमार चौबे साो, मा. सह पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे, मा. अप्पर पोलीस आयुक्त, श्री. वसंत परदेशी, मा. पोलीस उप आयुक्त, गुन्हे, संदीप डोईफोडे साो, मा.सहाय्यक पोलीस आयुक्त, गुन्हे – १, श्री. बाळासाहेब कोपनर, यांचे मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथक, गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. वैभव शिंगारे, सहा.पोलीस निरीक्षक प्रशांत महाले, पोउपनि श्री. ज्ञानेश्वर दळवी, पोलीस उप-निरीक्षक राजन महाडीक व पोलीस अंमलदार सहा. पोलीस फौजदार बाळासाहेब सुर्यवंशी, जिलानी मोमीन, प्रदिप शेलार, पोलीस हवालदार राजेंद्र बांबळे, दिनकर भुजबळ, संतोष दिघे, मनोज राठोड, संतोष भालेराव, अनिता यादव, पोलीस नाईक विजय दौंडकर, प्रसाद कलाटे, अजित कुटे, पोलीस शिपाई प्रसाद जंगीलवाड, रणधीर माने, मितेश यादव, सदानंद रुद्राक्षे, अशोक गारगोटे, कपिलेश इगवे व पाडुरंग फुंदे यांनी केली आहे.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट