फिजिओथेरपिस्ट मध्ये उत्तम गुणाने डाॅक्टरेट डिग्री मिळवणाऱ्या कु.पुर्वा विचारेचे मनसे तर्फे विशेष सत्कार..!

मुख्य संपादिका – दिप्ती भोगल
मुंबई :
महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रभाग क्रं २१८ च्या परिवारातर्फे कुमारी पूर्वा राजाराम विचारे हिने फिजिओथेरपिस्ट डॉक्टर उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपी येथून चांगल्या मार्गाने उत्तमरीत्या डिग्री मिळवली त्यामुळे मनसे परिवाराकडून तिचे अभिनंदन करण्यात आले .
त्यासोबत तिच्या आई-वडिलांचेही सत्कार करण्यात आला कारण या सर्व डिग्री मागे तिच्या आई-वडिलांची ही मेहनत आहे म्हणून मुली सोबत आई-वडिलांचाही सत्कार करण्यात आला.
सत्कार करताना शाखाध्यक्ष श्री रविंद्र शिंदे व उपशाखा अध्यक्ष श्री राजू खोत कुमार कशिश लोटलीकर श्री दिनेश पोतदार कुमार चिराग कारकोटे आणि महाराष्ट्र सैनिक ही उपस्थित होते पूर्वा राजाराम विचारे हिला पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देण्यात आल्या.