फलटण शहर पोलीसांनी शहरामध्ये जबरी चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगारास जेरबंद करून ९०५००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करुन केली अतिउल्लेखनीय कामगिरी…

उपसंपादक – रणजित मस्के
सातारा :-
फलटण शहर पोलीस ठाणे गुरजि.नं. ५५७/२०२३ भा.द.वि.स.कलम ३९२, ३४४ प्रमाणे दिनांक १७/०७/२०२३ रोजी दाखल असून सदर गुन्हयातील फिर्यादी हे त्यांचे कडील मोटार सायकल वरून काळुबाई नगर मलटण येथे जात असताना आरोपीने फिर्यादीची मोटार सायकल अडवुन थांबविले व मला मलटण मध्ये सोड, असे म्हणाले नंतर व फिर्यादीने नकार दिलेनंतर आरोपीने फिर्यादीच्या पाठीमागुन शर्टची कॉलर ओढली त्यावेळी फिर्यादी मोटार सायकल सह खाली पडला त्यानंतर आरोपीने फिर्यादीस हाताने मारहाण करुन फिर्यादीच्या मोटार सायकल यह खाली पडला त्यानंतर आरोपीने फिर्यादीस हाताने मारहाण करुन फिर्यादीच्य सॅक मधिल कॅशबॅग मधुन ३०,०००/- रुपये जबरीने काढून घेतली व खाली पडलेला मोबाईल घेतला. य फिर्यादीची मोटार सायकल जबरी घेवून तो निघुन गेला म्हणून वगैरे मजकुरचे खबरी वरुन गुन्हा रजिस्टरी दाखल करण्यात आला होता.
सदरचा गुन्हा दाखल झाल्यानंतर मा. सुनिल शेळके, पोलीस निरीक्षक सोर, फलटण शहर पोलीस ठाणे यांनी गुन्हयाचे तपासी अधिकारी श्री एस. व्ही. शिंदे, पोलीस उपनिरीक्षक यांना गुन्हे तपास कामी सुचना देवून खास विशेष पथकाची नियुक्ती केली. गुन्हयाचा तपास करत असताना पोलीस स्टाफ चे मदतीने घटनास्थळ रोड तसेच इतर संशयीत ठिकाणी आरोपी वर्णन, मोबाईलचे तांत्रीक विश्लेषण व गोपनिय बातमीदारांच्या मार्फतीने आरोपी यांचा शोध घेतला असता पोलीस ठाणे अभिलेखावरील तुपार ऊर्फ गया संजय ननवरे वय २१ वर्षे रा. झिरपेगल्ली मंगळवारपेठ फलटण ता. फलटण जि.सातारा यांने सदरचा गुन्हा केल्याचे निश्पन्न झाले सदर आरोपी यांचा शोध घेवून त्यांचे कडे तपास केला असता तो सुरवातीला उडवाउडवीची उत्तरे देत होता परंतु तपास पथकाने त्यांचे कडे कसोशिने, चिकाटीने, कौशल्यपूर्ण तपास करून सदरचा गुन्हा उघडकीस आणून सदर गुन्हयातील आरोपी यांस अटक करुन गुन्हयातील चोरीस गेलेला मुद्देमाल पैकी १०५००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल आरोपी यांचे कडुन जप्त करण्यात आलेला आहे.
सदर गुन्हयातील अटक आरोपी यांची सथा पोलीस अभिरक्षा मंजूर असून गुन्हयाचा तपास पो.उप.निरीक्षक श्री. सुरज शिंदे हे करत आहेत.

सदरची कामगीरी मा. श्री समीर शेख पोलीस अधिक्षक सो सातारा, मा. बापू बांगर अप्पर पोलीस अधिक्षक सोर, सातारा, श्री राहुल धस, उपविभागीय पोलीस अधिक्षक सो, फलटण भाग फलटण, श्री. सुनिल शेळके, पोलीस निरीक्षक, फलटण शहर पोलीस ठाणे यांचे मार्गदर्शनाखाली पो.उप.नि.सुरज शिंदे, पोहवा २०५० धायगुडे, पोहवा ११८३ चापते, पोहवा. २११ वाडकर, पोहया. ६६ काकुखे पांना ५९४ जगताप, पो. कॉ. १९९८ नाळे पो. कॉ. २४६६ जगदाळे, पोकों २५०१ अवघडे, पोकों १९५१ पाटोळे, पोकों २७०९ कर्णे, पोको २५१५ खराडे, पोको १५१४ टिके यांनी सदरची कारवाई केली आहे.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com