स्था. गुन्हे शाखा, सांगली यांनी एम.आय.डी.सी. येथील खुनाच्या गुन्हयातील आरोपी रितेश चव्हाण यांस केले जेरबंद

चोरीचा गुन्हा उघड

पोलीस स्टेशन
एम.आय.डी.सी. कुपवाड
अपराध क्र आणि कलम
९६/२०२५ बी.एन.एस. कलम १०३ (१), ३ (५)
फिर्यादी नाव
उमेश आप्पासो पाटील, रा मगदुम
प्लॉट, घरपट्टी ऑफिस शेजारी, विजयनगर, सांगली
गु.घ.ता वेळ
दि.२५/०५/२०२५ रोजीचे २०.३० वा.चे
गु.दा.ता वेळ २६/०५/२०२५ रोजी १४.५० वा.
माहिती कशी प्राप्त झाली पोहेकों / सागर लवटे
सुमारात
कारवाई करणारे अधिकारी आणि अंमलदार
मा. पोलीस अधीक्षक संदीप घुगे,
मा. उपविभागीय पोलीस अधिकारी मिरज, प्रणिल गिल्डा,
यांचे मार्गदर्शानाखाली
पोलीस निरीक्षक सतिश शिंदे, स्था. गु. अ. शाखा, सांगली
सहा पोलीस निरीक्षक, नितीस सावंत, स्था. गु. अ. शाखा, सांगली सहा पोलीस निरीक्षक, दिपक भांडवलकर, कुपवाड एम. आय.डी.सी. पोलीस ठाणे
सहा पोलीस निरीक्षक, पंकज पवार, स्था. गु. अ. शाखा, सांगली पोहेकों / सागर लवटे, संदिप गुरव, नागेश खरात, इम्रान मुल्ला, मच्छिंद्र बर्डे, अमोल ऐदाळे, दऱ्याप्पा बंडगर, संकेत मगदुम, अतुल माने, सतिश माने, अनिल कोळेकर, सागर टिंगरे, नागेश खरात, अगर नरळे, महादेव नागणे, पोना/संदिप नलावडे, पोशि/केरूबा चव्हाण, अभिजित पाटील, करण परदेशी, कुपवाड एम.आय.डी.सी. पोलीस ठाणेकडील गजानन जाधव, संदिप पाटील, प्रविण मोहिते, संदिप घस्ते बीड जिल्हयातील पोह/राजू पठाण, मनोज घोडके
ताब्यात घेतले दिनांक दि.२९/०५/२०२५ रोजी
मयताचे नाव
श्रवणेशनाथ महावीर चौगुले, वय २९ वर्षे, रा सिद्धविनायक पार्क, शिवशक्तीनगर, कुपवाड, सांगली,
मूळ गाव भोसे, ता गिरज
उघडकीस आलेला गुन्हा
कुपवाड एम.आय.डी.सी. पोलीस ठाणे ९२/२०२५ बी.एन.एस. कलम ३०९ (४), ३ (५)
आरोपीचे नाव व पत्ता
रितेश वसंत चव्हाण, वय २० वर्षे, रा वैदुवस्ती, विलासनगर, लातुर, सध्या रा आंबेजोगाई, जि बीड.
गुन्हयाची थोडक्यात हकीकत
दि. २५/०५/२०२५ रोजी रात्री २०.३० वा. चे सुमारास वरील आरोपी व त्याचे साथीदाराने फिर्यादी यांचा मेहुणा मयत श्रवणेशनाथ चौगुले यास त्याचे भाडयाचे राहते खोलीत कोणत्यातरी अज्ञात कारणावरून त्याचे प्रछातीतर त होतातर तार करून त्याचा रखन केला असलेबाबत तरील प्रमाणे एम आय डी सी कुपवाड पोलीस
मा. पोलीस अधीक्षक, सांगली संदीप घुगे यांनी सदर गुन्हयाचे गांभीर्य ओळखून घटनास्थळी भेट देवुन सदर गुन्हा उघडकीस आणून आरोपींना ताब्यात घेणेबाबत आदेशित केले होते.
सदर आदेशाप्रमाणे पोलीस निरीक्षक सतिश शिंदे, स्था. गु. अ. शाखा यांनी गुन्हयाचे ठिकाणी भेट देवून खुनाच्या गुन्हयातील आरोपीचा शोध घेणेबाबत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहा. पोलीस निरीक्षक नितीन सावंत व पोह/सागर लवटे, संदिप गुरव, नागेश खरात, संदिप नलावडे यांचे एक पथक तयार केले.
त्या अनुशंगाने सहा पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांचे पथकामधील पोहेकों/ सागर लवटे यांना त्यांचे गोपनिय बातमीदाराकडून बातमी मिळाली की, सदरचा खून हा बीड जिल्हयातील मयताचे ओळखीच्या रेकॉर्डवरील आरोपींनी केला आहे व सदर आरोपी हे बीड येथील आंबेजोगाई येथे असल्याची बातमी मिळाली.
नमूद पथकाने तेथील पोलीसांची मदत घेऊन आरोपींचा बीड व लातुर जिल्हयात शोध घेतला परंतु आरोपी तपास पथकास गुंगारा देत होते. पोलीस पथकाने ४ दिवस थांबून गोपनीय तांत्रिक माहिती व बातमीदारांमार्फत आरोपीचा शोध चालू ठेवला. दरम्यानच्या काळात आरोपीबाबत गोपनीय बातमी मिळाली की, यातील एक आरोपी हा बीड आंबेजोगाई येथील यशवंतराव चौक येथे आला आहे. बातमीप्रमाणे पथक हे आंबेजोगाई येथील वरील ठिकाणी जावून सापळा लावून थांबले असता, सदर आरोपी हा चौकात संशयितरित्या थांबलेला दिसला. लागलीच वरील बातमीप्रमाणे खात्री झाल्याने त्यास सहा पोलीस निरीक्षक नितीन सावंत व पथकाने पळून जाण्याची संधी न देता शिताफीने ताब्यात घेवून त्यास नाव गाव विचारता त्याने त्याचे नाव रितेश वसंत चव्हाण, वय २० वर्षे, रा वैदुवस्ती, विलासनगर, लातुर, सध्या रा आंबेजोगाई, जि बीड असे सांगितले.
त्याचेकडे वरील खुनाच्या गुन्हयाच्या अनुशंगाने चौकशी केली असता त्याने सांगितले की, यातील मयत व आरोपी हे एकत्र रूममध्ये राहणेस असताना दि. १७/०५/२५ रोजी कुपवाड एम.आय.डी.सी. पोलीस ठाणे हद्दीतील गुलमोहर कॉलनी येथे आरोपी व त्याचे साथीदारांनी मोटार सायकलवरून येवून महिलेच्या हातातील पर्स जबरदस्तीने हिसडा मारून जबरी चोरी केली होती. त्या जबरी चोरीमध्ये मिळालेल्या दागिन्याचे वाटणीवरून गयत व आरोपी यांचेमध्ये वाद झाला. त्या वादामध्ये आरोपी व साथीदारांनी मिळून त्याचे भाडयाचे राहते खोलीमध्ये मयताच्या छातीवर व डोक्यावर धारदार शस्त्राने वार करून त्याचा खुन केल्याची कबुली दिली.
सदर आरोपी रितेश वसंत चव्हाण हा बीड जिल्हयातील रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याचेवर चोरी व जबरी चोरीचे गुन्हे नोंद आहेत. या गुन्हयातील इतर निष्पन्न आरोपींचा शोध सुरू आहे.
सदर आरोपी पुढील तपास कामी एम.आय.डी.सी. कुपवाड पोलीस ठाणेकडे वर्ग करण्यात आले असुन पुढील तपास एम.आय.डी.सी. कुपवाड पोलीस ठाणे करीत आहेत.