पेट्रोल पंपवर लुटणारे आरोपी अवघ्या ३ तासात अटकस्था.गु.शा. व पो.स्टे. तळेगांव पोलीसांच्या ताब्यात..

सह संपादक – रणजित मस्के
अमरावती :


दि.०४/०४/२०२५ रोजी तळेगांव (द) ते पुलगांव महामार्गावर ग्राम नागापुर येथे असलेल्या राघव पेट्रोलपंप येथे काम करणा-या सेल्समन १) राहुल धनराज धोरते, वय २३ वर्षे, रा. सालोड, ह.मु. जळका पटाचे, २) सार्थक नगराळे, वय १९ वर्षे, रा. जळका पटाचे यांच्या डोळ्यात मिर्चीपुष्ठ फेकुन व त्यांना धक्का-बुक्की करून एका खोलीत बंद केले व पेट्रोल विक्रीचे जमा झालेले अंदाजे ३ ते ४ लाख रूपये नगदी अज्ञात २-३ इसमांनी रात्री ०८:०० वा. दरम्यान जबरीने हौसकावून नेल्याची माहीती दुरध्वनीव्दारे पेट्रोलपंपचा व्यवस्थापक (मॅनेजर) अभय नरेश राऊत, रा. जळका पटाचे यांनी तळेगांव पोलीस तसेच डायल ११२ वर कॉल करून सुध्दा माहीती दिली. नंतर याबाबत पेट्रोल पंप मालक श्री. संतोष प्रेमचंद मुंदडा, वय ५४ वर्षे, रा. धामणगांव रेल्वे यांना सुध्दा घडलेल्या प्रकाराबाबत माहीती दिली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात आरोपीतां विरूध्द पो.स्टे. तळेगांव (द) येथे अप.क्रं. १२०/२५ कलम ३०९ (४) भा.न्या.सं. अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
प्राप्त माहीतीवरून स.पो.नि.. श्री. रामेश्वर धोंडगे, ठाणेदार, पो.स्टे. तळेगांव यांनी तात्काळ प्रतिसाद देवून घटनास्थळी जावुन भेट दिली लगेच श्री. अनिल पवार, उप-विभागीय पोलीस अधिकारी, चांदुर रेल्वे व श्री. किरण वानखडे, पो.नि. स्था.गु.शा. व त्यांचे पथक सुध्दा घटनास्थळी पोहोचले. पिडीतांनी दिलेल्या माहीती नुसार आरोपीतांनी वापरलेल्या पांढ-या रंगाच्या मारोती सुझुकी ईको वाहनाचा शोध सुरू केला तसेच जिल्हयात व आजू-बाजुच्या जिल्हयात नाकाबंदी लावण्यात आली दरम्यान स्था.गु.शा., अमरावती ग्रा. व पो.स्टे. तळेगांब (द.) च्या पोलीस अधिका-यांना पंपचा व्यवस्थापक (मॅनेजर) व सेल्समन यांना विचारपुस करतांना त्यांच्या कवनीत तफावत येत असल्याचे निदर्शनास आले. वरून संशय निर्माण झाल्याने सेल्समन व मॅनेजर यांना घटनेबाबत सखोल विचारपूस करण्यात आली असता सर्वप्रथम त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. परंतु विश्वासात घेवुन अधिक विचारपुस केली असता पेट्रोलपंप मैनेजर १) अभय नरेश राऊत, रा. जळका पटाचे, २) राहुल धनराज धोरते, वय २३ वर्षे, रा. साप्लोड, ह.मु. जळका पटाचे यांनी संगणमत करून आपले सहकारी ३) ह्तीक शंकर टेकाम, वय २२, रा. येणस यांचे ईको वाहन वापरून ४) समित चन्द्रकुमार कणसे, वय २७,५) श्रावण ऊर्फ लहान्या राजेन्द्र कणसे, वय १९ दो.रा. येणस यांच्या मदतीने घटना केली असल्याची कबुली दिली. त्यानुसार वरील ०५ आरोपीतांना तात्काळ ताब्यात घेवुन विचारपुस केली असता त्यांनी गुन्हयाची कबुली दिली आहे. आरोपीतांना गुन्हयात अटक करण्यात आली असून गुन्हयात वापरलेले वाहन पांढ-या रंगाच्या मारोती सुझुकी ईको जप्त करण्यात आले असुन चोरी गेलेली रक्कम एकूण ०३,०६,०००/- नगदी आरोपीतांनाकडुन जप्त करण्याचा प्रयत्न सुरू आहे. पुढील तपास स.पो.नि. रामेश्वर घोडगे, ठाणेदार, पो.स्टे. तळेगांव करित आहेत.
सदरची कार्यवाही मा.श्री. विशाल आंनद, पोलीस अधिक्षक, अमरावती ग्रा., मा.श्री. पंकज कुमावत, अपर पोलीस अधिक्षक, अमरावती ग्रा., श्री. अनिल पवार, उप-विभागीय पोलीस अधिकारी, चांदुर रेल्वे यांचे मार्गदर्शनात पो.नि. किरण वानखडे, स.पो.नि. रामेश्वर धोंडगे, पो.उप.नि. सागर हटवार, मुलचंद भांबुरकर अमोल राठोड पोलीस अमंलदार सचिन मिश्रा, शकील चव्हाण, बळवंत दाभणे, मंगेश लकडे, गजेन्द्र ठाकरे, दिनेश कनोजीया, सचिन मसांगे, रविन्द्र बावणे, सचिन गायधने, विनोद राठोड, भुषण पेठे, पवन अलोणे, संदेश चव्हाण, पंकज शेन्डे, अमर काळे, जितेन्द्र राऊत, बंडु मेश्राम, गौतम गवळी यांचे पथकाने केली आहे.