पेट्रोल पंपावर दरोडा टाकणा-या टोळीला अटक करुन गुन्ह्यातील रोख रक्कम स्था. गुन्हे शाखा व राजगड पोलीसानी केली हस्तगत..

0
Spread the love

सह संपादक -रणजित मस्के

पुणे

राजगड पोलीस स्टेशन गुन्हा रजि नंबर २६०/२०२५ बी एन एस ३०९(४) ३ (५), आर्म अॅक्ट ४ (२५) प्रमाणे दिनांक ०६/०७/२०२५ रोजी गुन्हा घडलेला असुन सदर गुन्हयातील फिर्यादी नामे संग्राम दत्तात्रय कांबळे वय १८ वर्षे धंदा नोकरी रा कांजळे ता भोर जि पुणे हे दिनांक ०६/०७/२०२५ रोजी पहाटे ०१:२५ वा. सुमारास मौजे केळवडे ता भोर जि पुणे गावचे हददीतील पुणे सातारा पुणे रोडलगत असणारे एच पी कंपनीचा” राजगड मेट्रो पावर स्टेशन ” या पेट्रोल पंपावर चार अनोळखी इसम नाव पत्ता माहित नाही, त्यांनी दोन अॅक्सेस स्कुटी मोटार सायकलवर येवुन त्यांचे हातातील दोन लॉखडी कोयत्याचा धाक दाखवुन यातील फिर्यादी कडील एक सॅमसंग, व्हिओ कंपनीचा मोबाईल व ६०००/-रुपये रोख रक्कम असा एकुण २०,०००/-रुपये किंमतीचा माल जबरी चोरी करुन नेले बाबत वरील प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रात्रीच्यावेळी हायवे लगत असलेल्या पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्यात आला होता, सदर गुन्हयांचे गांभीर्य वाढल्याने मा. पोलीस अधीक्षक सो, पुणे ग्रामीण यांनी सदर गुन्हा उघडकीस आण्ण्याचे अनुषगाने योग्य ते मार्गदर्शन करुन सुचना केल्या होत्या. सदर गुन्हयाचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखा पथकाकडुन सुरू करण्यात आला. घटनास्थळांची पाहणी करुन आरोपीच्या मोटार सायकल ज्या दिशेने गेली आहे त्या रोडवरील सीसीटिव्हि फुटेज सलग तीन दिवस तपासणेत आलले सदरच्या फुटेज मध्ये उपयुक्त माहिती प्राप्त झाली की, सदर गुन्हयात एकुण दोन मो.सा.व सात आरोपींचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. सीसीटिव्हि फुटेजची पाहणी दरम्यान सदरचे इसम हे त्यांचे दुचाकीवरुन नारायणपुर, बोपदेव घाट मार्गे पुणे शहरातील कात्रज या परीसरात आलेचे निष्पन्न झाले. सीसीटिव्हि फुटेज, तांत्रिक विश्लेषण व गोपनीय बामतीदारांना फोटो दाखविण्यात आले असता, सदरचा गुन्हा हा इसम नामे समीर खान रा कात्रज पुणे याने त्यांचे साथीदाराचे मदतीने केल्याची माहिती मिळाली. व तो इतर साथीदारा सोवत खेडशिवापुर या ठिकाणी येणार असल्याचे बातमी मिळाली. बातमीच्या आधारे सापळा लावुन पथकाने आरोपी इसम नामे १) समीर हकीक खान वय १८ रा कात्रज गुजरवाडी रोड भारतनगर महादेव नगर ता हवेली जि पुणे २) महेंद्र आत्माराम ठाकुर वय १९ वर्ष रा जांभुळवाडी ता हवेली जि पुणे इतर ४ विधी संघर्षित बालक यास ताब्यात घेवुन त्याचेकडे चौकशी केली करता पाहिजे आरोपी इसम नामे करण राजेद्र सकट रा कात्रज यांने हि आमचे सोबत गुन्हा केल्याचे सागिंतले असुन त्यांनी दरोडा टाकतेवेळी एक व्हिओ कं.चा मोबाईल, गुन्हयातील ३०००/-रुपये रोख रक्कम्, व गुन्हयात वापरण्यात आलेल्या दोन दुचाकी हस्तगत करण्यात आलेल्या आहेत.

सदरची कामगिरी मा. पोलीस अधीक्षक, श्री संदीप सिंह गिल्ल सोो, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री गणेश बिरादार सो, बारामती विभाग, उपविभागीय पोलीस अधिकारी भोर विभाग, श्री तानाजी बरडे सो, यांचे मार्गदर्शनाखाली, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, राजगड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेश गवळी, स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि दत्ताजीराव मोहिते, पोलीस अंमलदार, अमोल शेडगे, अतुल डेरे, रामदास बाबर, अजित भुजबळ, मंगेश भगत, पोलीस अंमलदार धीरज जाधव, राजगड पोलीस स्टेशनचे सपोनि तुकाराम राठोड, पोसई अजित पाटील, पोलीस अंमलदार अक्षय नलावडे यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट