स्थानिक गुन्हे शाखा, सोलापूर ग्रामीण यांची कामगिरी ०४ गुन्हयातील पाहिजे आरोपीताकडून मंगळवेढा येथील ०३ घरफोडी चोरी गुन्हयांची उकल ५ तोळे ०२ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, ०१ मोटार सायकल व ०६ मोबाईल हॅन्डसेट असा एकूण ३,५५,०००/- रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत…

0
Spread the love

उपसंपादक-रणजित मस्के

सोलापूर:

दिनांक ०९/०६/२०२३ रोजी रात्री २३:०० वा. ते दिनांक १०/०६/२०२३ रोजी सकाळी ०५:०० वा चे सुमारास मौजे बठाण ता. मंगळवेढा येथे फिर्यादी व तिचे घरातील इतर लोक घरात झोपले असताना, अज्ञात चोरटयांनी
दरवाजाचे कडीकोयंडा उचकटून घरात प्रवेश करून घरातील कपाटातून लग्नाकरीता आणलेले सोन्याचे दागिने असा एकूण २,१०,००० रु. किंमतीचा मुद्देमाल घरफोडी चोरी करून चोरून नेले म्हणून विश्वास माणीक बेदरे, वय ३४ वर्षे, रा. बठाण मंगळवेढा यांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध फिर्याद दिल्याने मंगळवेढा पोलीस ठाणे गुरनं ४८२ / २०२३ भादवि कलम ४५७, ३८० प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता.

सहा. पोलीस निरीक्षक, शशिकांत शेळके व त्यांचे पथक मंगळवेढा शहरात हजर असताना त्यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, मंगळवेढा पोलीस ठाणे गुरनं ४८२/२०२३ भादविक ४५७, ३८० प्रमाणे दाखल असलेला गुन्हा हा रेकॉर्डवरील पाहिजे असलेल्या आरोपीने केला असून तो बोरोळे नाका मंगळवेढा येथे एका सिल्व्हर रंगाच्या मोटार सायकलसह थांबला आहे. त्यावरून तात्काळ त्याठिकाणी जावून मिळालेल्या बातमीप्रमाणे त्यास ताब्यात घेवून त्याचेकडे मिळून आलेल्या मोटार सायकलच्या कागदपत्राची मागणी केली असता त्याने कागदपत्रे नसल्याचे सांगितले, तेंव्हा त्याचे मोटार सायकलला अडकविलेली पांढ-या रंगाची प्लास्टिक पिशवी तपासून पाहिली असता, त्यामध्ये विविध कंपनीचे एकूण ०६ जूने मोबाईल हॅन्डसेट मिळून आले. त्याबाबत त्याचेकडे विचारपूस करता त्याने सांगितले की, मागील दिड ते दोन वर्षामध्ये ऊस तोडी कामगारांच्या झोपडीमध्ये चार्जिंग करीता लावलेले मोबाईल रात्रीच्या वेळी चोरी केले असल्याचे सांगितले.

तसेच त्याचेकडे मौजे बठाण ता. मंगळवेढा येथील घरफोडी चोरीच्या गुन्हयांचे अनुषंगाने कौशल्यपूर्ण तपास केला असता, त्याने सांगितले की, मागील सुमारे ०२ महिन्यापूर्वी मौजे बठाण येथे त्याचे इतर ०२ साथिदारासह घरफोडी चोरी केल्याचे सांगितले. त्यास आणखीन विश्वसात घेवून कौशल्यपूर्ण तपास केला असता, त्याने मागील ७ ते ८ महिन्यामध्ये मंगळवेढा येथील मौजे डोणज व सलगर या ठिकाणी ही घरफोडी चोरी केल्याचे सांगितले. त्याचेकडून एकूण ०५ तोळे ०२ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, ०१ मोटार सायकल व ०६ मोबाईल लॅन्डसेट असा एकूण ०३,५५,००० रु. किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आले आहे.

सदर आरोपीताकडून उघडकीस आलेल्या गुन्हयांची माहिती खालील प्रमाणे,सदरची कामगिरी ही शिरीष सरदेशपांडे, पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण, हिंमत जाधव, अपर पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांचे नेतृत्वाखाली सहा. पोलीस निरीक्षक शशिकांत शेळके, सफौ / ख्वाजा मुजावर, नारायण गोलेकर, पोहेकॉ / धनाजी गाडे, प्रकाश कारटकर, मोहन मनसावाले, धनराज गायकवाड, अक्षय दळवी, अक्षय डोंगरे, समीर शेख यांनी बजावली आहे.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट