गोंदिया जिल्ह्यात वाहतुकीचे नियम तोडणाऱ्यांविरोधात कलम 279 अन्वये कारवाई करुन गुलाब पुष्प देऊन स्वागत…

उपसंपादक-रणजित मस्के
गोंदिया :-
दिनांक- 27/06/ 2023 रोजी

पोलीस अधीक्षक श्री. निखिल पिंगळे, यांच्या मार्गदर्शनात हयगयीने, लापरवाहीने, भरधाव वेगाने वाहन चालविणाऱ्या विरूध्द धडक मोहीमे अंतर्गत कलम 279 भा.दं वि. अन्वये कारवाई. जिल्ह्यांत 101 गुन्ह्यांची नोंद. नियम तोडणाऱ्यांचे गुलाब देवुन स्वागत करण्यात आले.


याबाबत थोडक्यात माहिती अशी की, गोंदिया जिल्ह्यातील अपघाताचे वाढते प्रमाण, लक्षात घेऊन नागरिकांमध्ये विशेषतः गोंदिया शहरातील नवंतरुण तरुणी आणि जनतेमध्ये वाहतुकी चे नियमांची जनजागृती व्हावी. जिल्ह्यातील वाहतुकीला शिस्त लागावी वाहतूक व्यवस्था सुरळीत व्हावी याकरीता पोलीस अधीक्षक श्री. निखिल पिंगळे, यांनी दिनांक 23/06/2023 रोजी पोलीस अधीक्षक, कार्यालय, गोंदिया येथे वरिष्ठ अधिकारी यांचे बैठकीचे आयोजन करून वाहतुकीच्या नियमांची अंमलबजावणी

करण्याकरीता जिल्ह्यांत हयगयीने, लापरवाहिने बेदर्कारपणे गाडी चालवून लोकांचे जीवितास धोका निर्माण करणाऱ्याविरुद्ध कलम 279 अंतर्गत कारवाईची धडक मोहीम राबविण्याबाबत जिल्ह्यातील सर्व ठाणे प्रमुख, जिल्हा वाहतूक नियंत्रण शाखा, यांना निर्देश देवुन आदेशित सूचना केल्या होत्या.


या अनुषंगाने पोलीस अधीक्षक, श्री. निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक श्री. अशोक बनकर, उपविभागीय पोलीस अधिकारी गोंदिया, तिरोडा, देवरी, आमगाव यांचे मार्गदर्शनाखाली संपूर्ण गोंदिया जिल्ह्यात वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्याविरुद्ध जसे हयगयीने, लापरवाहीने, बेदरकारपणे, विरूध्द दिशेने गाडी चालविणे, अश्या विरुद्ध कलम 279 भादवी अन्वये कारवाई करण्याची मोहीम शनिवार दिनांक 24/06/2023 आणि रविवार दिनांक 25/06/2023 ला राबविण्यात आलेली आहे.
या अनुषंगाने संपूर्ण गोंदिया जिल्ह्यांत शनिवार आणि रविवारला राबविण्यात आलेल्या मोहिमेत वाहतूक नियमाचे उल्लंघन करणारे बेशिस्त वाहन चालक, हयगयीने वाहन चालविणाऱ्या विरूध्द कलम 279 भादंवि अन्वये गोंदिया जिल्हातील पो.स्टे. गोंदिया गोंदिया शहर- 7, गोंदिया ग्रामीण-11, रावणवाडी-2, तिरोरा-11, गंगाझरी-03, दवनीवाडा- 8, आमगाव-10, गोरेगाव- 9, सालेकसा-2, देवरी- 4, डूग्गीपार 10,अर्जुनी/मोर- 6, नवेगावबांध 7, केशोरी- 6, चिंचगड -5, असे एकूण 101 कारवाया करून गुन्हे नोंदविण्यात आलेले आहेत.
त्याचप्रमाणे पोलीस अधीक्षक मा. श्री.निखिल पिंगळे, यांचे संकल्पनेतून गोंदिया शहरात वाहतूकीचे नियमांचे उल्लंघन करणारे सिग्नल तोडणारे, विरुद्ध दिशेने गाडी चालविणारे अश्या एकूण 90 जणांना जिल्हा वाहतूक नियंत्रण शाखेतर्फे गुलाबपुष्प देण्यात आलेले आहेत.
गोंदिया जिल्हा पोलीस प्रशासन जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी व गोंदियाकरांचा त्रास कमी करण्याकरिता कटिबध्द असून जिल्हयातील सर्व पो. ठाणे, वाहतूक शाखा, जिल्ह्यातील वाहतूक रहदारीचे योग्य नियंत्रण ठेवण्यासाठी उपायोजना करून सदैव प्रयत्नशील आहे.
गोंदिया जिल्ह्यातील नागरिकांना, पुनःस्च विशेषतः अल्पवयीन मुले- मुली, शाळकरी विद्यार्थी आणि त्यांचे पालक यांना वाहतूक नियमांचे काटेकोर पणे पालन करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. अन्यथा वाहतूकीचे नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाईस सामोरे जावे लागू शकते. स्वतःचा व इतरांचा जिवितांचा विचार करून वाहन चालवावे.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com