पाटील वाडी २०२५ च्या PPL पर्व पहिले क्रिकेट स्पर्धेत कोबनाक ब्रदर्सचे वर्चस्व..

कार्यकारी संपादक- श्री दिपक भोगल
पंदेरी







गुरुवार दिनांक २२ मे २०२५ रोजी पाटील वाडी श्री कृष्ण क्रिकेट संघातर्फे तर्फे PPL क्रिकेट स्पर्धेचे भव्य दिव्य असे आयोजन होळीची पट्टी येथे करण्यात आले होते.
या स्पर्धेचे श्री गणेश पूजन ग्रामीण अध्यक्ष श्री दत्ताराम बिजन व उद्घाटन श्री दिपक भोगल यांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री कोबनाक गुरुजी यानी केले. या स्पर्धेत कोबनाक ब्रदर्स , आई एकवीरा माऊली , आकाश फायटरस, आरपी - 11 , डीएसपी -11 , आदियुग , संस्कार फायटरस आणि माऊली फायटरस या ८ संघानी आपला उत्तम सहभाग दर्शविला.
या स्पर्धेत झालेल्या अटीतटीच्या लढतीत कोबनाक ब्रदर्स यानी प्रथम क्रमांकाचे चषक आणि पारितोषिक पटकाविले असुन द्वितीय क्रमांकाचे चषक आणि पारितोषिक पटकाविणयात आई एकवीरा माऊली या संघाला अखेर यश आले.
या स्पर्धेत उत्कृष्ट सामनावीर म्हणून कुमार राहुल पोस्टुरे , उत्कृष्ट फलंदाज उर्मील पोस्टुरे आणि उत्कृष्ट गोलंदाज म्हणून श्री दीपक पोस्टुरे यांची निवड करण्यात आली आणि ही पर्व पहिले ppl स्पर्धा अतिशय आनंदीआनंद वातावरणात पार पडली.
यावेळी आदियुग संघमालक श्री. राजन पोस्टुरे , योगेश कोबनाक व कर्णधार श्री सुनील मालप , आकाश फायटरसचे संघमालक श्री कोबनाक गुरुजी व कर्णधार श्री अक्षय कोबनाक, आरपी -११ चे संघमालक श्री विनोद कोबनाक, रमेश पोस्टुरे व कर्णधार कुमार पियुष कोबनाक, डीएसपी -११ चे संघमालक श्री दिलीप भोगल , कुमार संदिप कोबनाक, पवन कोबनाक व कर्णधार श्री जितेंद्र पोस्टुरे, कोबनाक ब्रदर्सचे संघमालक श्री उर्मील कोबनाक व कर्णधार श्री. विघ्नेश कोबनाक, संस्कार फायटरसचे संघमालक श्री संतोष पोस्टुरे व कर्णधार कुमार सुजल कोबनाक, माऊली फायटरसचे संघमालक कुमार रूपेश पोस्टुरे व कर्णधार कुमार संकेत कोबनाक आणि आई एकवीरा माऊलीचे संघमालक कुमार सुभाष रेशिम व कर्णधार श्री दिपक पोस्टुरे यानी आपल्या संघातर्फे उत्तम प्रकारचे प्रदर्शन केले. या स्पर्धेत अति उत्कृष्ट खेळणाऱ्या खेळाडूंना उत्तेजनार्थ सुरक्षा पोलीस टाइम्सचे कार्यकारी संपादक श्री दिपक भोगल यांसकडून प्रत्येकी ५०० /- रूपये बक्षीस देण्यात आले.