पाटण येथील सडावाघापुर उलटा धबधबा येथे पर्यटकांची जबरी चोरी करुन लुटण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपी शशीकांत हुबाळे आणि विनायक पाटील यांच्या पाटण पोलीसांनी आवळल्या मुसक्या

सह संपादक -रणजित मस्के
पाटण

पाटण पोलीस ठाणे हददीत सडावाघापुर उलटा धबधबा या पर्यटनस्थळी दि.25.07.2025 रोजी सकाळी 10.45 वाचे सुमारास पर्यटक विशाल उत्तम पवार रा. नांदलापुर हे त्यांची पत्नी सह उलटा धबधबा येथील परिसरात निसर्ग भटकंती करत थांबले असताना दोन अनोळखी इसम सदर दांपत्याची लुटमार करण्याचे उद्देशाने त्यांचा छुपा पाठलाग करुन निर्जनस्थळी त्यांना चाकूचा धाक दाखवत जबरदस्तीने त्यांच्याकडे पैसे, दागिने, मोबाईल फोन ची मागणी करून जबरी चोरी करण्याचा प्रयत्न केला असल्याची माहिती पोलीस ठाण्यास मिळाली.
सदर गुन्हयांचे गांभीर्य लक्षात घेवुन मा. पोलीस अधिक्षक सो, सातारा श्री तुषार दोशी, मा.अपर पोलीस अधिक्षक सो, सातारा श्रीमती. वैशाली कडुकर तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. विजय पाटील सो यांचे मार्गदर्शनाखाली पाटण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अविनाश कवठेकर व पथक यांना फिर्यादी यांनी वर्णन केलेल्या अनोळखी दोन इसमांचा तात्काळ घटनास्थळी व आजुबाजुचे परीसरात गोपनिय बातमीदाराद्वारे व स्थानिक लोकांचे मदतीने कसोशीने शोध घेतला असता त्यातील एक इसम मिळुन आला सदर इसमास ताब्यात घेतले व पोलीस ठाण्यात तक्रारदार यांची फिर्याद घेवुन पाटण पोलीस ठाणे येथे दखलपात्र गुन्हा रजिस्टर नंबर 117/2025 भारतीय न्याय संहिता कलम 309 (5), 3 (5), प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला.
सदर ताब्यात घेतलेल्या इसम नामे शशिकांत मारुती हुबाळे वय 40 वर्षे राहणार वाळवा तालुका वाळवा जिल्हा सांगली याला अधिक विश्वासात घेवुन चौकशी केली असता सदरचा गुन्हा हा त्याचा साथीदार विनायक पाटील वय अंदाजे 35 वर्षे रा. वाशी नवी मुंबई असे दोघांनी सदर दांपत्याची लुटमार करण्याचे उद्देशाने संगणमत करून जबरी चोरी करण्याचा प्रयत्न केला असल्याचे गुन्हा कबुल केलेला आहे.
सदरचा आरोपी हा अभिलेखावरील सराईत गुन्हेगार असुन त्यांचेवर सांगली जिल्हा येथे गंभीर स्वरुपाचे गुन्हे नोंद आहेत. सदर गुन्हयाच्या तपासमध्ये आरोपी याच्याकडुन एक हिरो कंपनीची दुचाकी स्प्लेंडर मोटरसायकल किंमत 75 हजार अंदाजे जप्त केली असुन सदरची मोटारसायकल बाबत कोकरूड पोलीस ठाणे जि. सांगली येथे मोटारसायकल चोरी गुन्हा दाखल असल्याचे निष्पन्न झालेले आहे.
सदरची कारवाई ही मा. पोलीस अधिक्षक सो, सातारा श्री तुषार दोशी, मा.अपर पोलीस अधिक्षक सो, सातारा श्रीमती वैशाली कडुकर तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी श्री विजय पाटील सो यांचे मार्गदर्शनाखाली श्री अविनाश कवठेकर, पोलीस निरीक्षक, पाटण पोलीस ठाणे, श्री प्रकाश भुजबळ, सपोनि, व पोलीस उपनिरीक्षक श्री शिंदे, श्री सदगर, श्री राऊत, पोहवा 2166 पुजारी, 1090 कुचेकर, पोकों 1125 हजारे, 1835 कांबळे, 1106 माने, 1308 नलवडे यांनी सहभाग घेतलेला असुन सदर गुन्हयाचा अधिक तपास PSI श्री विकास शिंदे हे करीत आहेत.
कारवाईत सहभागी अधिकारी व अंमलदार यांचे श्री तुषार दोशी पोलीस अधीक्षक सो सातारा श्रीमती वैशाली कडुकर, अपर पोलीस अधीक्षक सो सातारा यांनी अभिनंदन केलेले आहे.