पाटण तालुक्यातील मल्हारपेठ पोलीसांनी दमदार सी.सी.टी.व्ही. फुटेजवरुन मोटार सायकल चोरीचा गुन्हा २४ तासात उघडकीस आणून आरोपी गणेश पवार यांस केले जेरबंद

सह संपादक -रणजित मस्के
सातारा

मल्हारपेठ पोलीस ठाणे गु.र.नं. १०८/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम ३०३(३) मधील फिर्यादी नामे विक्रम दादासो सुर्यवंशी, वप २१ वर्षे, रा. मल्हारपेट, ता. पाटण, जि. सातारा यांनी त्याची ७०,०००/- रुपये किंमतीची हिरो कंपनीची स्प्लेन्डर मॉडेलची मोटार सायकल क्रमांक MH ५० T ३७५५ ही दिनांक २३/०७/२०२५ रोजी रात्री ११.१५ वा. ते दिनांक २४/०७/२०२५ रोजी सकाळी ९.०० वा. चे दरम्यान घराच्या समोर पार्किंग केली असता, ती कोणीतरी अज्ञात इसमाने चोरुन नेली असल्याबाबत तक्रार दिल्याने बर नमूद प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्हयाचे तपासाच्या अनुषंगाने मा. श्री. तुषार दोशी सो, पोलीस अधीक्षक, सातारा., मा. श्रीमती डॉ. वैशाली कडूकर सो, अप्पर पोलीस अधीक्षक, सातारा., मा. श्री. विजय पाटील सो, उपविभागीय पोलीस अधिकारी सो, पाटण विभाग, पाटण यांचे मार्गदर्शनाखाली मल्हारपेठ पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी श्री. चेतन मछले सो, सहाय्यक पोलीस निरीक्षक, मल्हारपेठ यांनी सदर गुन्हयातील आरोपीस तात्काळ ताब्यात घेणेबाबत सुचना दिल्याने प्रभारी अधिकारी श्री. मछले यांनी नमूद गुन्हयाचे तपासाच्या अनुषंगाने स.पो.फी. जाधव, पो.शि. १४७४ पिसे, पो.शि. १७६४ पवार यांचे तपास पथक तयार करुन त्यांना गुन्हयाचे तपासाच्या अनुषंगाने सुचना व मार्गदर्शन करुन गुन्हयाचे घटनास्थळाचे तसेच मल्हारपेठ ग्रामपंचायतीचे सी.सी.टी.व्ही. पुटेज पाहणेबाबत सांगितले. त्याप्रमाणे सी.सी.टी.व्ही. फुटेज पाहत असताना एक संशयीत इसम हा मोटार सायकल चोरुन घेऊन जात असल्याचे सी.सी.टी.की. फुटेज दिसून आल्याने ते सी.सी.टी.व्ही. फुटेज प्राप्त करुन खास बातमीदारांना दाखवून आरोपीचा शोध घेणेबाबत कळविले त्याप्रमाणे नमूद मोटार सायकल घेऊन जाणारा इसम गणेश शंकर पवार, वय ३२ वर्षे, रा. मंदुळ, ता. पाटण, जि. सातारा हा असल्याची माहिती प्राप्त झाली. त्याप्रमाणे त्यास ताब्यात घेऊन त्यास विश्वासात घेऊन त्याचेकडे अधिक चौकशी केली असता, त्याने गुन्हा केला असल्याचे कबूल करुन गुन्हयातील मोटार सायकल ही नवरस्ता येथे ठेवली असल्याची सांगितले. त्याप्रमाणे तो दाखवित असलेल्या ठिकाणावरुन गुन्हयातील चोरीस गेलेली ७००००/- रुपये किंमती मोटार सायकल हस्तगत करण्यात आली आहे.
सदरची कारवाई मा. श्री. तुषार दोशी सो, पोलीस अधीक्षक, सातारा., मा. श्रीमती डॉ. वैशाली कडूकर सस्रो, अप्पर पोलीस अधीक्षक, सातारा., मा. श्री. विजय पाटील सोो, उपविभागीय पोलीस अधिकारी सो, पाटण विभाग, पाटण यांचे मार्गदर्शनाखाली मल्हारपेठ पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी श्री. चेतन मछले सो, सहाय्यक पोलीस निरीक्षक, मल्हारपेठ पोलीस ठाणे, स.पो. फो. जाधव, पो.शि. १४७४ पिसे, पो.शि. १७६४ पवार यांनी गुन्हयातील चोरीस गेलेली मोटार सायकल हस्तगत केलेली आहे. गुन्हयाचा पुढील तपास स.पो. फौ. जाधव करीत आहेत.
सर्व अधिकारी व अंमलदार यांचे मा. श्री. तुषार दोशी सो, पोलीस अधीक्षक, सातारा., मा. श्रीमती डॉ. वैशाली कडूकर सो, अप्पर पोलीस अधीक्षक, सातारा., मा. श्री. विजय पाटील सो, उपविभागीय पोलीस अधिकारी सो, पाटण विभाग, पाटण यांनी कौतुक व अभिनंदन केले आहे.
आरोपी नाव- गणेश शंकर पवार, वय ३२ वर्षे, रा. मंदुळ, ता. पाटण, जि. सातारा