पार्टीत अश्लील हावभाव करणार्‍या 17 महिला-पुरुषांना लोणावळा ग्रामीण पोलीसांनी केली अटक

0
Spread the love

पुणे : लोणावळा ,कार्ला गाव ,एमटीडीसी हद्दीतील ,दुर्गा सोसायटीत, तन्वी बंगल्यात, पार्टीत गैरकृत्य करणाऱ्या १७ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोठ्या आवाजात गाणे लावून त्यावर अश्लील हावभाव करणाऱ्या १७ जणांवर लोणावळा ग्रामीण पोलिसांनी कारवाई केली असून यात ९ पुरुष व ८ महिलांचा समावेश आहे. त्यांच्याजवळील वाहने, फोन असा सुमारे ७४ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे

लोणावळा ग्रामीणचे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. प्रवीण मोरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, तन्वी बंगल्यामध्ये मोठ्या आवाजात गाणे लावून त्यावर अश्लील हावभाव करून नाचत होते. याबाबत माहिती मिळाल्यानंतर, लोणावळा उपविभागीय अधिकारी श्री. राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने दोन पंचांच्या उपस्थितीत छापा टाकला.

तेथून एकूण १७ जणांना ताब्यात घेऊन अटक केली खासगी बंगल्यामध्ये विनापरवाना गैरकृत्य करताना ऋषिकेश संजय पठारे, अमित कृष्णा मोरे, योगेश संदेश काशिद, विकास रामचंद्र पारगे, कैलास मारुती पठारे, स्वप्निल जगदीश तापकीर, विनोद रमेश डख, प्रसाद बाळासाहेब वीर, नागेश कुंडलीक थोरवे (सर्व रा. चव्होली व भोसरी परिसर) यांच्यासह ८ महिलांना अटक केली आहे. तेथून रोख रक्कम, मोबाईल फोन, चारचाकी ५ वाहने, स्पीकर असा एकूण ७४ लाख २७ हजार ६३० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

सदर कारवाई पोलीस अधीक्षक श्री. अभिनव देशमुख, पोलीस उप अधीक्षक श्री. मितेश घट्टे, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री. प्रवीण मोरे, पोलीस उपनिरीक्षक श्री. सचिन बनकर, सहायक फौजदार युवराज बनसोडे, पोलीस नाईक प्रणयकुमार उकिर्डे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः

मोबा.नं. 9920601001

info@surakshapolicetimes.com

dipakbhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट