परिमंडळ ३ कल्याण मध्ये मेफेड्रॉन (एम.डी) व ‘गांजा’ अंमली पदार्थ विकी करणाऱ्या आरोपींना पोलिसांनी केली अटक

प्रतिनिधी विश्वनाथ शेनोय
दि १९ कल्याण ठाणे

पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ३ कल्याण यांचे विशेष कारवाई पथकाने व खडकपाडा पोलीस ठाणे यांनी परिमंडळात बेकायदेशीर अंमली पदार्थ विकी करणारे विरूध्द अंमली पदार्थ विरोधी पथकाने कारवाई करण्यात आली.दि.१८/०७/२०२५ रोजी बाजारपेठ पोलीस ठाणे हददीत सुमारास फोर्टीस हॉस्पीटलचे समोर ए.पी.एम.सी मार्केटचे पाठीमागील रोडवर कल्याण प.येथे विशेष कारवाई पथक गस्त करत असताना दोन इसम मेफेड्रॉन (एमडी) हा अंमली पदार्थ विक्री करण्याच्या उद्देशाने मिळून आल्याने त्याबाबत अधिक तपास केले असता त्याच्याकडे ११० ग्रॅम वजनाचा मेफेड्रॉन (एम.डी) अंदाजे रू.२२,००,०००/- किंमतीचा हा अंमली पदार्थ मिळुन आले आहे. आरोपी नामे १) मोहम्मद कैफ मन्सुर शेख, वय २४ वर्षे रा. मेहेक मंजील रूम नं.९ २ मजला बैलबाजार कल्याण प. व २) फरदीन आसीफ शेख वय २४ वर्षे रा. डिम कॉम्पलेक्स, बी ०१ रूम नं.२ कोनगांव भिंवडी यास ताब्यात घेण्यात आले आहे. आरोपीतांवर बाजारपेठ पोलीस ठाणे येथे गु.र.नं.४३७/२०२५ एन.डी.पी.एस कायदा कलम ८ (क), २२ (क) २९ प्रमाणे गुन्हा दाखल करून पुढील तपास चालु आहे.त्याच प्रमाणे दि.१७/०७/२०२५ रोजी खडकपाडा पोलीस ठाणे हददीत सुमारास योगी धाम, अमृतधाम सोसायटीकडे जाणारे रोडवर, साई दर्शन ढाब्यासमोर, वालधुनी नदीचे बाजुला खडकपाडा कल्याण प या ठिकाणी इसम नामे १) रवि शिवाजी गवळी वय ३० वर्षे रा. अनुपमनगर जयदुर्गे चाळ, मोकळे मैदानाचे बाजुला भाडोत्री खोली खडकपाडा कल्याण प.जि.ठाणे हे त्यांच्या ताब्यात ११२० ग्रॅम इतका अंदाजे रू.२५,०००/- किंमतीचा गांजा हा अंमली पदार्थ विकी करण्याच्या उद्देशाने मिळुन आल्याने आरोपींनंवर खडकपाडा पोलीस ठाणे येथे गु.र.नं.ता ५९८/२०२५ एन.डी.पी.एस कायदा कलम ८ (क), २० (ब), गा (ब) प्रमाणे गुन्हा दाखल करून पुढील तपास चालु आहे.
सदरची कामगिरी परिमंडळ ३ कल्याण विशेष कारवाई पथक व पोलीस ठाणे यांनी संयुक्तपणे केली आहे. अशा प्रकारे परिमंडळ ३ कल्याण मध्ये अंमली पदार्थ विकी विरूध्द कारवाई सुरू राहणार असल्याची माहिती दिली