परिमंडळ ५ मधील कोंढवा पोलीस ठाणे यांचेमार्फत मुस्लिम बांधवांकरीता रमजान निमीत्तानेदावत-ए-इफ्तारचे आयोजन…

0
Spread the love

सह संपादक- रणजित मस्के

पुणे

दिनांक ०१/०३/२०२५ रोजीपासून मुस्लिम समाजासाठी पवित्र रमजान महिन्याची सुरुवात झाली आहे. सदर रमजानचे औचित्य साधून आज दिनांक ०६/०३/२०२५ रोजी परिमंडळ ५ मधील कौसरवाग, कोंढवा, पुणे येथे डॉ. राजकुमार शिंदे, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ५ व परिमंडळ ५ मधील अधिकारी व अंमलदार यांच्या वतीने मुस्लिम बांधवांकरीता दावत ए इफ्तार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

सदर कार्यक्रमास मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर श्री. अमितेश कुमार, मा. पोलीस सह आयुक्त श्री. रंजनकुमार शर्मा, मा. अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग, श्री. मनोज पाटील इ. मान्यवर उपस्थित होते.

सदर कार्यक्रमास परिमंडळ ५ कार्यक्षेत्रामधील एकूण ९ पोलीस ठाणे येथील वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पोलीस निरीक्षक गुन्हे व इतर अधिकारी उपस्थित होते. मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर श्री. अमितेश कुमार यांनी पुणे शहर पोलीसांच्या वतीने रमजानच्या निमीत्ताने मुस्लिम बांधवांना हार्दिक शुभेच्छा दिल्या व रमजान महिना शांततेमध्ये पार पाडण्यावाचत पोलीस प्रशासन कायदा व सुव्यवस्था, वाहतूक नियमन इ. बाबतीत सर्वतोपरी सहकार्य करेल, असे आश्वासन दिले.

सदर कार्यक्रमास कोंढवा परीसरातील ७०० ते ८०० महिला व पुरुष जनसमुदाय उपस्थित होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट