परिमंडळ ५ मधील हडपसर पोलीस ठाणे अंतर्गत अल्पवयीन मुलीसोबत बलात्कार केलेल्या गुन्ह्यातील आरोपीस वीस वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा…

0
Spread the love

सह संपादक- रणजित मस्के

पुणे

थोडक्यात हकिकत :-

सदर घटना ही डिसेंबर २०१७ मध्ये वाकवस्ती, झोरेवस्ती, पांडवदंड, फुरसुंगी, पुणे येथे फिर्यादी यांचे राहते घरी घडली आहे. यातील आरोपी भिमराव मुकिंदा कांबळे, वय २७ वर्षे, रा. पुयना समाज मंदिराशेजारी, पाण्याचे हापश्यासमोर, पोस्ट सांडस, ता. कळमनुरी, जि. हिंगोली याने यातील अल्पवयीन पिडीत निर्भया ही घरामध्ये एकटी असल्याचा व घरामध्ये अंधार असल्याचा गैरफायदा घेऊन तसेच ती अल्पवयीन असल्याची पूर्ण जाणिव असताना घरामध्ये घुसून तिचेशी जबरदस्तीने संभोग करुन तिला गर्भवती केले व हाताने मारहाण करुन जिवे मारण्याची धमकी दिली. म्हणून फिर्यादी अल्पवयीन पिडीत निर्भया हिने दिलेल्या तक्रारीवरुन हडपसर पोलीस ठाणे येथे गुन्हा क्रमांक २७६/२०१८ भा.दं.वि. कलम ३७६, ३२३, ५०४, ५०६ सह बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम सन २०१२ चे कलम ६, ८, १२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

तपास

सदर गुन्हयाचा तपास श्रीमती. कल्याणी शिंदे, म. सहा. पोलीस निरीक्षक यांनी केला व यातील आरोपींविरुद्ध मा. न्यायालयामध्ये मुदतीत दोषारोपपत्र सादर केले. सदर केसचा स्पे. (चाईल्ड प्रोट.) केस क्र. ३२९/२०१८ असा आहे.

शिक्षा

वरील प्रकरणामध्ये सथळ साक्षीपुराव्याअंती मा. विशेष न्यायाधीश (पोक्सो), जिल्हा व सत्र न्यायालय, शिवाजीनगर, पुणे यांनी दिनांक २१/०३/२०२५ रोजी आरोपी भिमराव मुकिंदा कांबळे यास २० वर्षे सश्रम कारावास व १० हजार रुपये दंड व दंड न भरल्यास सहा महिने साधा कारावास अशी शिक्षा सुनावली आहे.

कामगिरी

सरकारी पक्षातर्फे अति. सरकारी वकील श्री. विलास घोगरे-पाटील, कोर्ट पैरवी श्री. संभाजी म्हांगरे व श्री. ए.जे. गोसाची यांनी कामकाज पाहिले. सदर कामगिरीकरीता प्रोत्साहन म्हणून डॉ. राजकुमार शिंदे (भा.पो.से), पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ५, पुणे शहर यांनी कोर्ट पैरवी पोहवा ४९५४ म्हांगरे, पोहचा ३२४ गोसावी व नमूद गुन्हयाचे तपासी अधिकारी मसपोनि श्रीमती. कल्याणी शिंदे यांना १० हजार रुपये बक्षिस मंजूर केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट