पनवेल तालुका पोलीसांनी ३४ किलो ४०० ग्रॅम गांजा केला जप्त…

उपसंपादक-रणजित मस्के
पनवेल:-मा.श्री मिलिंद भारंबे पोलीस आयुक्त नवी मुंबई, मा.श्री संजय येनपुरे पोलीस सह आयुक्त, मा.श्री दीपक साकोरे अपर पोलीस आयुक्त(गुन्हे),श्री.अमित काळे पोलीस उपायुक्त(गुन्हे शाखा) तसेच श्री.अजय कुमार लांडगे सहाय्यक पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी कक्षाचे वपोनि/नीरज चौधरी यांच्या पथकाने मिळालेल्या माहितीच्या आधारे आजिवली गावाजवळ सापळा रचून 34 किलो 400 ग्रॅम वजनाचा अंदाजे 6 लाख 88 हजार रुपये किमतीचा गांजा जप्त केला.

सदर ठिकाणी दोन आरोपीस ताब्यात घेतले असून पनवेल तालुका पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com