पाण्याची बाटली विकत घेण्याच्या बहाण्याने महिलांच्या गळयातील मंगळसुत्र चोरणा-या चोर मारुती आंधळे पुणे पोलीसांचे ताब्यात

0
Spread the love

पुणे

सह संपादक -रणजित मस्के

  त्यांचे कडुन ८ जवरी जोरीचे गुन्हे उघड करुन १० तोळे २०० मिली गॅम वजनाचे सोन्याचे दागिने व मोटर सायकल असा एकुण १०,१०,०००/- रुपये किमंतीचा मुददेमाल केला हस्तगत. स्थानिक गुन्हे शाखा व रांजणगाव पोलीस स्टेशनची संयुक्त कारवाई

रांजणगाव एम आय डी सी पोलीस स्टेशन गुन्हा रजि नंबर ९४/२०२५ बी एन एस ३०९ (४) प्रमाणे दिनांक २५/०३/२०२५ रोजी गुन्हा घडलेला असुन सदर गुन्हयातील फिर्यदी नामे श्रीमती वंदना रोहिदास शेटे वय ३३ धंदा व्यवसाय स्नॅक्स सेंटर रा. पिंपरी दुमाला ता शिरुर जि पुणे या मौजे रांजणगाव गणपती चौक येथील धनगरवाडा स्नॅक्स सेंटर मध्ये उभ्या असताना दोन अनोळखी इसम मोटार सायकल वरुन दुकानाचे समोर आले त्यापैकी एक इसम हा दुकानात आला व त्याने पाण्याची बॉटल दया, असे म्हणुन फिर्यादी यांना ५० रुपये दिले.त्यावेळी फिर्यादी यांनी पाण्याचे बाटलीचे पैसे घेवुन उरलेली रक्कम त्यांना परत देणे करीता दुकानातील पैश्यांच्या ड्रावर मध्ये वाकुन त्यांना पैसे परत देत असताना सदर अनोळखी इसमांने फिर्यादीचे गळ्यातील ११ गॅम वजनाचे सोन्याचे मिनी गंठण जबरदस्तीने ओढुन घेवुन त्यांचा बाहेर स्पोर्टस बाईक सह उभा असलेला साथीदारसह चोरी करुन पळुन गेला आहे. त्याबाबत फिर्यादीने रांजणगाव पोलीस स्टेशन या ठिकाणी तक्रार दिली आहे.

सदर गुन्हयांचा तपास स्थानिक गुन्हे शाखा तसेच रांजणगाव पोलीस स्टेशनकडील तपास पथक करीत होते. तपासा दरम्यान घटनास्थळांवरील सी सी टि व्हि फुटेज तपासुन चोरटयांनी गुन्हा करते वेळी वापरलेली स्पोर्टस बाईक टि व्हि एस अपाची कंपनीची असल्याचे निष्पन्न केली. तसेच दरम्यानच्या काळात शिरुर, शिक्रापुर व पिंपरी चिंचवड आयुक्तालयातील चाकण, आळंदी पोलीस स्टेशन तसेच अहिल्यानगर जिल्हयातील कर्जत पोलीस स्टेशन या ठिकाणी हि अश्या पध्दतीचे गुन्हे घडल्याने पिंपरी चिंचवड येथील गुन्हे शाखेचे पथक, आळंदी व चाकण पोलीस स्टेशनकडील तपास पथके अहिल्यानगर जिल्हयातील कर्जत पोलीस स्टेशनकडील तपास पथक हे हि नमुद आरोपी यांचा शोध घेत होते त्यांनाही सदरचे आरोपी मिळुन येत नव्हते.

सदर आरोपी यांचा शोध घेत असताना अश्या प्रकारचे गुन्हे करणारे रेकॉर्डवरील गुन्हेगार तसेच जेल रिलीज झालेले गुन्हेगार यांना चेक केले तसेच सर्व घटनास्थळांवरील सी सी टि व्हि फुटेज प्राप्त करुन ती एकत्रित करुन त्यांची तपासणी करुन आरोपीचा जाणेचा व येणेचा मार्ग निश्चित करुन सदर मार्गावर गेले दहा दिवसांपासुन स्थानिक गुन्हे शाखा व रांजणगाव पोलीस स्टेशनकडील स्टाफसह संयुक्तरीत्या सापळे लावण्यात आले होते परंतु आरोपी हे वारंवार चकवा देत होते. घटनास्थळापासुन ते बीड जिल्हयापर्यत सुमारे ३०० ते ३५० कॅमेरे तपासण्यात आले. तसेच सर्व घटनास्थळांवरील तांत्रिक विश्लेषण करण्यात आले. तांत्रिक विश्लेषण व बातमीदाराकडुन माहिती काढून त्याआधारे सदरचा गुन्हा हा इसम नामे मारुती ऊर्फ गोविंद रामनाथ आंधळे वय ३८ रा लिंबोडी पोस्ट देवीनिमगाव ता आष्टी जि बीड यांने त्याचा साथीदार नामे शरद बापु पवार रा लोणी सव्यदमीर ता आष्टी जि बीड याचेसह केला असल्याचे निष्पन्न झालेने सदर आरोपीचा शोध घेत असताना आरोपी नामे मारुती रामनाथ
आंधळे वय ३८ रा लियोडी पोस्ट देवीनिमगाव ता आष्टी जि बीड हा अहिल्यानगर ते शिरुर त्यांचेकडे असलेल्या स्पोर्टस बाईक वरुन येणार असल्याची खात्रीशीर बातमी पोलीस अमंलदार उमेश कुतवळ यांना मिळाली. सदर बातमीच्या अनुषगाने स्थानिक गुन्हे शाखा व रांजणगाव पोलीस स्टेशन कडील स्टाफ यांनी संयुक्तरीत्या शिरुर हददीत सतरा कमान पुलाचे अलीकडे सापळा लावुन त्यांचे जवळील टि व्हि एस कंपनीची अपाची आर १६० मॉडेलची मोटार सायकलसह ताब्यात घेवुन त्यांचेकडे सखोल तपास केला असता त्याने सदरचा गुन्हा हा त्यांचा मित्र शरद बापु पवार रा लोणी सय्यदमीर ता आष्टी जि बीड यांचेसह केल्याचे सागितले. तसेच त्यांनी शिरुर, शिक्रापुर व पिंपरी चिंचवड आयुक्तालयातील चाकण, आळंदी पोलीस स्टेशन तसेच अहिल्यानगर जिल्हयातील कर्जत पोलीस स्टेशन हददीत अश्या प्रकाराचे गुन्हे केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. नमुद आरोपी यांचेकडुन गुन्हयात वापरलेली टि व्हि एस अपाची मोटार सायकल व एकुण ८ गुन्हयातील १० तोळे २०० मिली गॅम वजनाचे सोन्याचे दागिने असा एकुण किंमत १०,१०,०००/-रुपयेचा मुददेमाल हस्तगत केला आहे. नमुद आरोपी हा सध्या रांजणगाव एम आय डी सी पोलीस स्टेशनचे पोलीस कस्टडी मध्ये आहे.

आरोपीकडुन उघडकीस आलेले गुन्हे खालील प्रमाणे

पोलीस स्टेशन
रांजणगाव
९४/२०२५ वी एन एस ३०९ (४)

आंळदी

१४४/२०२५ बी एन एस ३०९ (४)

रांजणगाव

१८३/२०२५ वी एन एस ३०९ (४)

चाकण

३७५/२०२५ बी एन एस ३०९ (४)

शिरुर

शिक्रापुर

३८१/२०२५ बी एन एस ३०९ (४)

चाकण

२४३/२०२५ बी एन एस ३०९ (४)

१०५४/२०२४बी एन एस३०९ (४)

कर्जत

३४०/२०२५ बी एन एस ३०९ (४)

सदरची कामगिरी मा.पोलीस अधीक्षक सो, श्री संदीप सिंह गिल्ल सोो, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री रमेश चोपडे, पुणे विभाग, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले सो, यांचे मार्गदर्शनाखाली, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, रांजणगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे, स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि दत्ताजीराव मोहिते, सपोनि कुलदिप संकपाळ, पोलीस हवालदार तुषार पंदारे, पोहवा जनार्दन शेळके, पोहवा राजु मोमीन, पोहवा संजु जाधव, पोहवा योगेश नागरगोजे पोलीस अंमलदार सागर धुमाळ, रांजणगाव पोलीस स्टेशनचे पोसई थोरात, सहा. फौजदार दत्ता शिंदे, पोलीस अंमलदार उमेश कुतवळ, पोलीस अंमलदार योगेश गुंड, पोलीस अंमलदार संतोष सांळुखे, पोलीस अंमलदार खरबस, साळवे यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट