पन्हाळा पोलीसानी शेळी, मेढ्या चोरणा-या चोरट्यांचा शोध घेवुन एकुण २,५०,०००/- रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करुन दोन गुन्हे उघड

कोल्हापूर :
उपसंपादक-रणजित मस्के
पोलीस ठाणे
पन्हाळा पोलीस ठाणे
गुन्हा रजि नं व कलम
गुन्हा नोंद क्रमांक २४४/२०२४ भा.द.वि.स. कलम ३०३(२) प्रमाणे दिनांक २८/१२/२०२४ रोजी दाखल आहे.
फ़िर्यादी नाव पत्ता
युवराज तानाजी गळवी रा. माजगाव ता. पन्हाळा
गुन्हा घडला ठिकाण-
माजगाव पैकी शिंदेवाडी जमीन गट नं ३२७ मधुन
चोरीस गेला माल
१,२६,०००/- त्यात २१ मेढ्या काळ्या व तपकीरी रंगाच्या
माहीती कशी प्राप्त झाली
सीसीटीव्ही फुटेज व पो.हवा १५३८ समीर मुल्ला यांना बातमीदारामार्फत
कारवाई करणारे अधिकारी व अंमलदार मा. पोलीस अधिक्षक कोल्हापुर श्री महेन्द्र पंडीत साो,
मा. अपर पोलीस अधिक्षक साो श्रीमती जयश्री देसाई साो, मा.उप विभागीय पोलीस अधिकारी शाहुवाडी विभाग कोल्हापुर श्री आप्पासो पवार यांचे मार्गदर्शनाखाली मा. संजय बोंबले सहाय्यक पोलीस निरीक्षक पन्हाळा पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी महेश कोंडुभैरी पोलीस उप निरीक्षक, तपासीक अंमलदार सहाय्यक फौजदार सिताराम डोईफोडे, पो.हवा १५३८ समिर मुल्ला, पो. अंमलदार ८९३ रविंद्र कांबळे, सहाय्यक फौजदार नाईक, सहाय्यक फौजदार गेंगजे, पो.हवा ६२३ डमाळे, पो.हवा ६१८ सर्जेराव पाटील, पो.ना ३१७ विलास जाधवर, पो. अंमलदार २३६२ वोरचाटे चालक पो.हवा २४९१ वायदंडे, सर्व नेमणूक पन्हाळा पोलीस ठाणे
निष्पन्न आरोपी नाव पत्ता
१) परशराम मारुती पवार वय-३३ रा. तुडये ता. चंदगड जि. कोल्हापुर २) मोहमद शाहिद मोहमंद गौस काकर वय-२७ रा.घर नं ४७२४ काकर गल्ली बेळगाव जि. बेळगाव राज्य कर्नाटक
३) महेबुब अब्दुल मुलतानी वय-५८ रा. गुंजानहट्टी ता.हुक्केरी जि. बेळगाव राज्य कर्नाटक यांना दिनांक १०/०१/२०२५ रोजी १२.५५ वा अटक
थोडक्यात हकिगत
पन्हाळा पोलीस ठाणे गुन्हा नोंद क्रमांक २४४/२०२४ भा.द.वि.स. कलम ३०३(२) प्रमाणे दिनांक २८/१२/२०२४ रोजी दाखल आहे. सदर गुन्हाचा तपास संजय बोंबले सहाय्यक पोलीस निरीक्षक यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकातील अंमलदार पो.हवा १५३८ समिर मुल्ला, पो. अंमलदार ८९३ रविंद्र कांबळे हे करत असताना तपासादरम्याण त्यांनी गुन्हा घडले ठिकाणचे आजुवाजेचे परिसरातील सीसीटीव्ही फुटेज पडताळणी केली असता त्यामध्ये एक चार चाकी संशयीत वाहनाचा शोध घेवुन माजगाव ता. पन्हाळा ते चंदगड पर्यंत जवळपास ३० ते ३५ सीसीटीव्ही फुटेज तपासत त्याचा माग काढुन आरोपीत निष्पन्न करुन आरोपी नामे १) परशराम मारुती पवार वय ३३ रा.तुडये ता. चंदगड जि. कोल्हापुर २) मोहमद शाहिद मोहमंद गौस काकर वय-२७ रा.घर नं ४७२४ काकर गल्ली बेळगाव जि. बेळगाव राज्य कर्नाटक ३) महेबुब अब्दुल मुलतानी वय-५८ रा. गुंजानहट्टी ता. हुक्केरी जि. बेळगाव राज्य कर्नाटक यांना ताब्यात घेवुन तपास करता त्यांनी पन्हाळा पोलीस ठाणे हद्दीत माजगाव पैकी शिंदेवाडी ता. पन्हाळा येथील जमीन गट नं ३२७ मध्ये २१ मेढ्या चोरी केलेचे कबुल केलेने त्यांना दिनांक १०/०१/२०२५ रोजी १२.५५ वा अटक केली होती त्यांची पाच दिवस पोलीस कस्टडी घेवुन अधिक तपास करता त्यांनी राशीवडे ता. राधानगरी येथे सुद्धा मेढ्या चोरी केलेचे कबुल केले असुन सदर सराईत चोरट्यांकडुन दोन लाख रुपये किमतीचे ओमनी चार चाकी वाहन व मेळ्या विक्री करुन कमवीलेली ५०,०००/- रुपये रोख रक्कम असा एकुन २,५०,०००/- रुपयाचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. सदर आरोपींचे शोधाकामी तपास पथकातील अंमलदार पो.हवा १५३८ समिर मुल्ला, पो. अंमलदार ८९३ रविंद्र कांबळे यांनी खुप विषेश मेहनत घेतली असुन सदरची कामगीरी संजय बोंबले सहाय्यक पोलीस निरीक्षक यांचे मार्गदर्शनाखाली महेश कोंडुभैरी पोलीस उप निरीक्षक, तपासीक अंमलदार सहाय्यक फौजदार सिताराम डोईफोडे, पो. हवा १५३८ समिर मुल्ला, पो. अंमलदार ८९३ रविंद्र कांबळे, सहाय्यक फौजदार नाईक, सहाय्यक फौजदार गेंगजे, पो. हवा ६२३ डमाळे, पो. हवा ६१८ सर्जेराव पाटील, पो.ना ३१७ जाधवर, पो. अंमलदार २३६२ बोरचाटे, चालक पो.हवा २४९१ वायदंडे, यांनी केलेली आहे.
सर्व गावातील व्यापारी बंधुंना विनंती आहे. की, आपण आपले स्तरावर आप-आपले दुकानात दुकानाबाहेर मेन रोडवर सी.सी.टी.व्ही बसवावेत जेणेकरुन अशा प्रकारची किंवा अन्य कोणतीही अप्रिय घटना, चोरी घडलेस आरोपीचा शोध घेणेस पोलीसांना मदत होईल.