पंढरपूर येथील उप विभागीय पोलीस अधिकारी अर्जुन भोसले यांची बदली, नूतन डी वाय एस पी म्हणून प्रशांत डगळे रुजू होणार.

प्रतिनिधी- उमेश वाघमारे
सोलापूर

पंढरपूर येथील उप विभागीय पोलीस अधिकारी अर्जुन भोसले यांची बदली झाली असून नूतन उप विभागीय पोलीस अधिकारी जागी प्रशांत डगळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील चिमुर या तालुक्याचा पदभार ते पाहत होते.
गृह विभागाने बदलीचा आदेश जारी केला आहे.
यामुळे पंढरपूर तालुक्याला नवीन डी वाय एस पी मिळाला असून प्रशांत डगळे
यांच्यासमोर तालुक्यातील वाळू तस्करी, अवैध दारू,.
मावा, गुटखा वाहतूक, विक्री रोखण्याचे आव्हान असणार आहे, याप्रमाणेच पंढरपूर शहरातील गँगवॉर,
भुरटी दादागिरी, महिला व मुलींची छेडछाड रोखण्याचे आव्हान असणार आहे.
नूतन पोलीस अधिकारी कसा वचक बसवतील याकडे स्थानिक नागरिकांचे लक्ष लागले आहे.