पंढरपूर येथे अवैध 2 गावठी पिस्तूल जप्त

0
Spread the love

सह संपादक – रणजित मस्के

पंढरपूर ;

श्री. क्षेत्र पंढरपूर हे अखंड महाराष्ट्राचे दैवत ….विठूरायाची नगरी….. येथे प्रत्येक वर्षी मोठ्या प्रमाणात वारी भरत असते. त्यामध्ये लाखो भावीक विठूरायाच्या दर्शनासाठी येतात. तसेच प्रत्येक महिन्याला देखील एकादशीच्या दिवशी मोठया प्रमाणात येत असतात. तसेच येथे दररोज हजारो वारकर्याची ये-जा असते.
परंतू या पंढरी नगरीस मागील काही वर्षापासून गुंडगिरीचे ग्रहण लागले आहे. यामध्ये सक्रीय टोळ्यावर पोलीसांनी योग्य ती कायदेशीर कारवाई करून गुंडाना जेलमध्ये टाकले आहे. यातून दिनांक 07/05/2025 रोजी एकाचा खून करण्यासाठी काही विधीसंघर्षग्रस्त बालक अवैध अग्निशस्त्र घेवून पंढरपूर येथील सांगोला रोडवरील एका ठिकाणी येणार असल्याबाबतची खा़त्रीशीर माहिती पंढरपूर शहर पोलीसांना लागली होती.
यावर कारवाई करण्यासाठी मा.श्री. अर्जुन भोसले, उपविभागीय पोलीस अधिकारी, श्री. विश्वजीत घोडके यांनी अतिशय सूक्ष्म नियोजन केले. ज्या परीसरात हे लोक अग्निशस्त्र घेवून येणार होते. त्या भागात त्यांचेकडील हूशार व माहितीगार पोलीसांना साध्या वेशात तैनात केले. बातमीमध्ये मिळालेल्या माहिती प्रमाणे साध्या वेशात पोलीस सदर भागात येणारे जाणारे संशयीत इसमांवर लक्ष ठेवून थांबले… त्यावर बातमीप्रमाणे इसम सदर भागात आले असल्याचे दिसून येताच ठरलेल्या नियोजनप्रमाणे त्यांना सापळ्यात पकडले. त्यातील दोन इसमांना जागीच पकडण्यात आले तर एक त्या ठिकाणाहून पळून जाण्यात यशस्वी झााला त्यांचेकडे पोलीसांनी दोन गावठी पिस्टल जप्त करण्यात आलेला आहे. सदरबाबत पंढरपूर शहर पोलीस ठाणे येथे भारतीय शस्त्र अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला असून सदर दोन अल्पवयीन मुले ही मागील वैमनस्यामधून एकावर खून हल्ला करण्यासाठी आले असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामागील सुत्रधारास देखील आरोपी करण्यात आलेले आहे. गुन्ह्याचा सविस्तर तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट