राज्यातील व परराज्यातील दोन ट्रॅक्टर ट्रॉलीसह, ३१ मोटारसायकली चोरी करणा-या टोळी विरुध्द पंढरपूर शहर पोलीस ठाण्याची धडक कारवाई…

0
Spread the love

सोलापूर:

पंढरपूर शहर पोलीस ठाणे हददीत पंढरपुर शहरात मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणनेचे उद्देशाने मा. पोलीस अधिक्षक शिरीष सरदेशपांडे, मा. अपर पोलीस अधिक्षक श्री. हिम्मतराव जाधव, मा. श्री विक्रम कदम उपविभागीय पोलीस अधिकारी, पंढरपुर विभाग, पंढरपुर यांचे सुचनेनुसार व पंढरपुर शहर पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक श्री. अरुण फुगे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी व अंगलदार यांची विशेष पथके नेमुन पंढरपुर शहर व परिसरातील ज्या ठिकाणी मोटार सायकल चोरी जाणेचे प्रमाण जास्त आहे त्या ठिकाणचे घटनास्थळ निरीक्षण करून व त्यावर बारकाईने लक्ष ठेवुन गोपनीय बातमीदार यांचे मार्फतीने मोटार सायकली चोरीबाबतची माहिती काढणेचे काम सुरू असताना गोपनिय बातमीदाराकडुन एक बातमी मिळाली की, एक इसम पंढरपुर येथे चोरीचे मोटारसायकल विक्री करणेकरीता येणार असलेबाबतची माहिती मिळालेले गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अंमलदार यांनी सापळा रचुन त्याठिकाणी संशयास्पदरित्या फिरत असलेल्या इसमास ताब्यात घेतले व पोलीस ठाणेस आणुन त्याचेकडे सखोल चौकशी केली असता, त्याने आपण चोरीची मोटारसायकल विक्री करीता घेवुन आलो असलेची सांगीतलेने त्याचेकडे सलगपणे चौकशी केली असता त्याने आपण तसेच आपले साथीदारांनी पंढरपूर शहर व परिसरातील त्याचप्रमाणे सांगोला, मंगळवेढा, सातारा, सांगली या जिल्ह्यातून मोटारसायकल, लोखंडी नांगर, ट्रॅक्टर, इंजिन पंप, रोटर तसेच कर्नाटक राज्यातुन ट्रॅक्टर, ट्रॉली देखील चोरल्याचे सांगीतले. या सर्व संशयितांच्या वास्तव्याची माहिती हस्तगत करून घेवुन त्यांना ताब्यात घेऊन गुन्ह्याचा कौशल्यपुर्ण सखोल तपास केला असता आरोपींनी

 

पंढरपुर शहर पोलीस ठाणेस दाखल असलेले भाग ५ गुरनं १) गुरनं २०४ / २०२३ भादवि कलम ३७९ प्रमाणे २) २०५/२०२३ भादवि कलम ३७९३) २३३ / २०२३ भादवि कलम ३७९ प्रमाणे ४) ११३ / २०२३ भादवि कलम ३७९५) १२७ / २०२३ भादवि कलम ३७९६) २४६ / २०२३ भादवि कलम ३७९७) ७३ / २०२३ भादवि कलम ३७९८) ८६ / २०२३ भादवि कलम ३७९९) ४१०/२०२२ भादवि कलम ३७९१०) ७३७/२०२२ भादवि कलम ३७९ प्रमाणे पंढरपुर शहर पोलीस ठाणे येथे दाखल असलेले गुन्हे केल्याचे कबूल केले आहे.

 

सदरची कामगीरी ही मा. पोलीस अधिक्षक शिरीष सरदेशपांडे, मा. अपर पोलीस अधिक्षक श्री. हिम्मतराव जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी पंढरपूर विभाग श्री. विक्रम कदम, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पंढरपूर शहर पोलीस ठाणे श्री. अरुण फुगे यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सपोनि श्री. केंद्रे, सपोफी राजेश गोसावी, सपोफी नागनाथ कदम, पोह १०६३ बिपीन ढेरे, पोह ३९६ सुरज हॅबाडे, पोह ४१९ शरद कदम, पो.ना. १७३६ सचिन इंगळे, पो.ना. १६५७ दादा माने, पो.ना. १००५ शोएब पठाण, पो.ना. २२१ प्रसाद औटी, पो.ना. ४८४ सुनिल बनसोडे, पो.ना. ५६२ राकेश लोहार, पो.ना. १७८९ सचिन हॅबाडे, पोशि १२१६ शहाजी मंडले तसेच सायबर शाखा सोलापुर ग्रामीण चे पोशि अन्दर आतार यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट