पाचगणी पोलीस स्टेशन यांची बारबालांवर कारवाई..

उपसंपादक-रणजित मस्के
पाचगणी ;(मिलार (कासवंड) पाचगणी येथील हॉटेल हिराबाग (बिलीव्ह) येथील विभत्स डान्सवर पाचगणी पोलीसांची कारवाई) पांचगणी सारख्या जागतीक पर्यटन ठिकाणी गायिकांच्या व महिला वेटरच्या नावाखाली बारबाला महिला आणुन त्यांना संगिताच्या तालावर उत्तान कपडयात विभत्स हावभाव करुन अंगविक्षेप करुन नृत्य करीत असलेल्यांवर मा.श्री. समिर शेख पोलीस अधीक्षक सो सातारा, मा. वैशाली कडुकर अप्पर पोलीस अधीक्षक साो, सातारा व उपविभागिय पोलीस अधिकारी श्री. भालचिम साो वाई विभाग वाई यांनी कडक कारवाई करणेबाबत निर्देश दिलेप्रमाणे सपोनि दिलीप पवार पांचगणी पोलीस ठाणे यांनी दि. 07.01.2025 रोजी त्यांचे खास बातमीदारामार्फत त्यांचेकडील खास पथकामार्फत पांचगणी भिलार कासवंड, पाचगणी येथील हॉटेल हिराबाग हॉटेलचे हॉलमध्ये गायीकांच्या व महीला वेटरच्या नावाखाली हॉटेल मालक यांनी वेगवेगळ्या ठिकाणाहुन 12 महीला आणुन त्यांना बारबाला या संगिताचे तालावर उत्तान कपड्यात बिभत्स हावभाव करुन अंगविक्षेप करुन नृत्य करीत असलेबाबत समजल्याने सपोनि पवार पांचगणी पोलीस ठाणे व सोबत पोलीस उप निरीक्षक बालाजी सोनुने, सफौ रविंद्र कदम, पोहवा श्रीकांत कांबळे ब.क्र.1283, पो. हवा. कैलास रसाळ ब.क्र.1374, पो. हवा. विनोद पवार ब.क्र.644 पो.हवा. सचिन बोराटे ब.क्र.1158, पोलीस नाईक तानाजी शिंदे ब.क्र.962, पो.काँ. उमेश लोखंडे ब.क्र.762, पो.काँ. सुमित मोहिते ब.क्र.1406, म.पो.हे.कॉ. रेखा तांबे ब.क्र.2182 असे मिळाले बातमीचे ठिकाणी रवाना झाले. रात्रौ पांचगणी भिलार कासवंड, पाचगणी येथील हॉटेल हिराबाग (बिलीव्ह) चे हॉलमध्ये छापा टाकला असता सदर हॉटेलच्या हॉलमध्ये जावुन पाहीले असता 12 बारबाला आळीपाळीने येवुन उत्तान कपडयात तेथे सुमारे 20 गि-हाईकांच्या समोर उभ्या राहुन विभत्स हावभाव करुन गि-हाईकांच्या जवळ जावुन त्यांचेशि लगट करीत असल्याचे दिसले. सदर बारबालाच्या या कृत्यावर गि-हाईक इसम आनंद घेवुन त्यांचे सोबत नृत्य करीत होते. त्यावेळी आम्हा पोलीसांनी छापा टाकला असता 20 जणांना ताब्यात घेतले त्यामध्ये हॉटेल मालक यांचेसह इतर 20 लोकांवर गुन्हा दाखल करणेत आला असुन सदर ठिकाणाहुन साऊंड सिस्टीम, माईक, मोबाईल व कार असा एकुण 25,45,500/- रू किंमतीचे साहीत्य जप्त करून ताब्यात घेण्यात आले आहे. घडलेल्या प्रकाराबाबत भा.न्या.सं. कलम 296, 223 महाराष्ट्र हॉटेल आणि मध्यपानकक्ष (बाररुम) मधिल अश्लिल नृत्यावर प्रतिबंध घालण्याबाबत व महीलांचे प्रतिष्ठेचे संरक्षण अधिनीयम 2016 चेकलम 3, 8 महाराष्ट्र दारूबंदी अधिनीयम 75 (क) प्रमाणे गुन्हा दाखल करणेत आला आहे.गुन्हयाचा पुढील तपास मा.श्री समिर शेख पोलीस अधीक्षक सो, सातारा, मा. वैशाली कडुकर अपर पोलीस अधीक्षक सो, सातारा, मा. भालचिम उपविभागीय पोलीस अधिकारी, वाई यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि दिलीप जी. पवार पांचगणी पोलीस ठाणे हे करीत आहेत.