पालघर येथे भारत विकास परिषदेची स्थापना प्रमुख पाहुणे श्री. केदार काळे…

प्रतिनिधी-महेश वैद्य
- मनुष्यांवर संस्कार झाले नाहीत तर मनुष्य व पशु मध्ये फरक राहणार नाही : केदार काळे
सेवा व समर्पण ह्यामुळेच समाज घडतो : नगराध्यक्ष डॉक्टर उज्ज्वला काळे

पालघर: दिनांक 15 ऑगस्ट 2022 रोजी पालघर येथे भारत विकास परिषदेची स्थापना झाली. भारत विकास परिषद संपर्क ,संयोग, संस्कार, सेवा व समर्पण या पाच सूत्री वरती सामाजिक काम करीत असतो . यात भारत को जानो प्रतियोगिता, राष्ट्रीय समूह गायन प्रतियोगिता, गुरुवंदन छात्र अभिनंदन , बाल युवा परिवार प्रौढ संस्कार योजना, गुरु तेंग बहादूर बलिदान दिवस ,विकलांग सहाय्यता, आदिवासींमध्ये काम, ग्राम वस्ती विकास योजना, पर्यावरण ,स्वास्थ ,सामूहिक विवाह ,जरूरत मंद महिला व बच्चों के लिए कानूनी सहाय्यता, राहत कार्य, अशी अनेक कामे भारत विकास परिषद करत असते. पालघर येथील स्थापनेच्या वेळेस प्रमुख पाहुणे म्हणून केदार काळे मार्गदर्शन करत होते तेव्हा ते म्हणाले मानवावर संस्कार झाले तरच तो सुसंस्कृत होतो नाहीतर पशु व मानवात फरक राहणार नाही ,संस्कारी मानवच देशाचा व आपल्या गावाचा विकास करू शकतो ,नगराध्यक्ष डॉक्टर उज्ज्वला काळे यांनी संपर्क, संयोग, संस्कार, सेवा, समर्पण, याबद्दल माहिती दिली व सेवा व समर्पण यामुळेच सामाजिक काम करता येते असे भाषणात सांगितले.

ह्या कार्यक्रमासाठी भारत विकास परिषदेचे राष्ट्रीय वरिष्ठ उपाध्यक्ष सी .ए .श्री संपतजी खुराडीया उपस्थित होते ,त्यांनी पालघर येथे भारत विकास परिषदेच्या पदाधिकाऱ्यांची घोषणा केली ,प्रेसिडेंट म्हणून नरेशचंद्र जैन, चेअरमन म्हणून दिनेश जैन, खजिनदार म्हणून दिलीप जैन , आणि महिला आघाडी प्रमुख सौ अनिता जैन व इतर पदाधिकाऱ्यांची नावे घोषित केली ,त्यावेळेस मुंबई प्रांत प्रेसिडेंट विद्याधरजी मोखल ,जनरल सेक्रेटरी दिलीपजी महेश्वरी, ऑर्गनायझर डॉक्टर अनिलजी शुक्ला हे भारत विकास परिषदेचे पदाधिकारी आले होते . पालघर मधील अनेक प्रतिष्ठित व्यापारी व समाज बांध नागरिक उपस्थित होते .होलसेल व्यापारी असोसिएशनचे श्री भगवानलाल जैन रिटेल व्यापारी असोसिएशनचे सवाराम चौधरी श्री हिम्मत जैन हे उपस्थित होते. पालघर प्रमाणेच बोईसर डहाणू येथे भारत विकास परिषदेची स्थापना लवकरात लवकर केली जाईल असे राष्ट्रीय वरिष्ठ उपाध्यक्ष श्री संपतजी खुराडीया यांनी घोषित केले.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com