पालघर येथे रिपाई आठवले गटाच्या वतीने भारत जिंदाबाद यात्रा संम्पन्न

उप संपादक -मंगेश उईके
पालघर






संपूर्ण महाराष्ट्रभर मा. ना. डॉ. रामदासजी आठवले साहेब ( सामाजिक न्याय राज्यमंत्री-भारत सरकार तथा राष्ट्रीय अध्यक्ष रिपाई आ. )यांच्या आदेशानुसार भारत जिंदाबाद यात्रा सुरू असताना रिपाई पालघर जिल्हा अध्यक्ष सुरेश जाधव यांच्या नेतृत्वाखाली भारतीय सैनिकांच्या सन्मानार्थ पालघर शहरात भारत जिंदाबाद यात्रेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी पहलगाम येथे झालेल्या अतिरेक्यांच्या भ्याड हल्ल्यात शहीद झालेल्या व युद्धात वीरगती प्राप्त झालेल्या वीर शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.ऑपरेशन सिंदूर नंतर जगभरातून भारतीय सैनिकांचे कौतुक होत असताना आपल्या सैन्य दलाचे मनोबल वाढविण्यासाठी दि.२८/०५/२०२५ रोजी पालघर स्टेशन ते पाचबत्ती (हुतात्मा चौक) पर्यंत भारत जिंदाबाद यात्रेचे आयोजन रिपाई आ. पालघर जिल्ह्याच्या वतीने करण्यात आले होते.
यावेळी भारतीय तिरंगा झेंडा हाती घेऊन भारत माता की जय, वंदे मातरम, भारतीय सैनिकांचा विजय असो, पाकिस्तान मुर्दाबाद या घोषणांनी परिसर दणाणून गेला गुजरात कच्छ येथील एक सभेत बोलताना भारताचे पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी यांनी पाकिस्तानला ठणकावून सांगितले भारत की लढाई सीमा पार पल रहे आतंकवाद से है, एक तो सुख चैन जिंदगी जिओ, रोटी खाओ वरना गोली तो है ही मेरी मोदी असा सज्जड दम पाकिस्तानला दिल्यानंतर त्या पार्श्वभूमीवर आमच्या भारत देशाकडे जो कोणी वाकड्या नजरेने पाहिल त्याला आम्ही धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही दहशतवादाच्या विरोधी आम्ही सदैव भारतीय सेना व सरकारच्या सोबत आहोत असे प्रतिपादन यावेळी जिल्हाध्यक्ष सुरेश जाधव यांनी केले.
यावेळी रत्नाकर भालेराव( कार्याध्यक्ष पा.जि.),सुभाष शिंदे( पा.जि. अध्यक्ष मी वडार महाराष्ट्राचा), कुंदन मोरे( उपाध्यक्ष पा.जि.),पुष्पराज फुलारा( संघटक पा.जि.), राजकुमार यादव( संघटक पा.जि ),रोहिणी गायकवाड,( म.आ.अध्यक्षा पा.जि.)संजोग उपाध्याय( संघटक म. आ.पा.जि. ), सचिन भारस्कर (संघटक पा.जि.) सूर्यवंशी साहेब ( माजी सहाय्यक पोलीस निरीक्षक),शरद जाधव (युवा अध्यक्ष पा.ता.) राम ठाकूर (युवा उपाध्यक्ष पा.ता.),सचिन घाडीगावकर( युवा संघटक पा.ता.),राजू शेख( युवा सहसंघटक पा.ता.)वर्षा काटेला (अध्यक्षा अनु.ज. सेल म. आ.पा.जि.),संजय पाटील (शाखा अध्यक्ष चहाडे),संकेत वरठा (गिरणोली शाखा अध्यक्ष), राजेश उपाध्याय,वर्षा उंबरठा( जिल्हा सह संघटक म. आ.पा.जि.), विमल चौधरी (उपाध्यक्षा म.आ.पा.जि.),सुरेखा नम (पा.ता. सह संघटक म.आ.) हर्षाला धानवा (अध्यक्षा म.आ.अनु.ज. सेल पा.ता.),अनिता पागधरे (महिला कार्यकर्त्यां )प्रकाश पागधरे, श्रुती पागधरे, प्रथमेश पागधरे, विशाल पटेल, धनश्री जाधव व शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.