पालघर येथे कृषी विभागातर्फे आंबा फळबाहाराचा जाहीर लिलाव..

0
Spread the love

उपसंपादक-मंगेश उईके

पालघर

दि 25 : कृषी विभागाच्या राज्यस्तरीय मध्यवर्ती फळ रोपवाटिका दापचरी ता. डहाणू, जिल्हा पालघर, या रोपवाटिका प्रक्षेत्रावरील आंबा फळ फळबाहाराचा जाहीर लिलाव खुल्या बोली पद्धतीने दिनांक 04/03/2025 रोजी सकाळी ठीक 11:00 वाजता उपविभागीय कृषी अधिकारी ,पालघर यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आला आहे. याबाबतचे सर्व अधिकार उपविभागीय कृषी अधिकारी पालघर यांच्याकडे राखून ठेवण्यात आले आहेत. लिलावात सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी रुपये 1000/- (अक्षरी- रुपये एक हजार मात्र) एवढी अनामात रक्कम दिनांक 04/03/2025 रोजी कार्यालयीन वेळेत किंवा लिलावाच्या दिवशी सकाळी ठीक १० वाजेपर्यंत दापचरी, तालुका डहाणू फळ रोपवाटिकेच्या कार्यालयात भरणा करून लिलावात सहभागी होता येईल. लिलावाच्या बाबत अटी व शर्ती राज्यस्तरीय मध्यवर्ती फळ रोपवाटिका ,दापचारी यांच्या सूचना फलकावर लावण्यात आल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट