पालघर रेल्वे पोलिसांच्या कार्य तत्परतेमुळे एका दोन वर्षाच्या मुलीला शोधून सुरक्षित पालकाच्या ताब्यात देण्यात आले..!

उपसंपादक : मंगेश उईके
पालघर.
दिनांक 9/01/25 रोजी रात्री 22.15 वाजताच्या सुमारास एक प्रवासी नामे रविराज अकेंद्रसिंग कुमार वय 27 वर्ष, राहणार – टाटा हाऊस फ्लॅट नंबर 203 , बिल्डिंग नंबर एस एल फोर दाढीया क्लस्टर बेटेगाव बोईसर पूर्व हे त्यांची मुलगी नामे दिव्यांशी,वय 02 वर्ष हिच्यासह बोईसर रेल्वे स्टेशन येथे आले होते. नमूद प्रवासी हे त्यांची दोन वर्षाची लहान मुलगीला प्लॅटफॉर्मवरच ठेवून ब्रिज वरून बॅग आणण्यासाठी गेले होते. त्यानंतर ते प्लॅटफॉर्मवर थोड्याच वेळात परत आल्यानंतर त्यांच्या लक्षात आले की त्यांची मुलगी प्लॅटफॉर्मवर नाही. दरम्यान त्या प्लॅटफॉर्मवरून १०/२१ वा ची .लोकल डहाणूच्या दिशेने गेले होती. सदरबाबत नमूद प्रवासी यांनी गस्तीवरील अंमलदार यांना माहिती दिली.
सदर घटनेचे गांभीर्य ओळखून पालघर रेल्वे पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. सचिन इंगवले यांनी लागलीच बोईसर रेल्वे स्टेशन येथे रात्रपाळी कर्तव्यावरील पो.शि. 1348/शेळके यांनी वानगाव रेल्वे स्टेशन येथील पोलिस अंमलदार पो.शी. 411/ पाटील व पोलीस शिपाई 498/गायकवाड यांना माहिती देऊन नमूद लोकल चेक करण्यास सांगितले.तेंव्हा नमूद आमलदार यांनी तत्काळ सदरची लोकल ट्रेन ही वानगाव रेल्वे स्टेशन येथे चेक केली असता सदरची मुलगी ही नमूद लोकलच्या डब्यात एकटीच मिळून आली व त्या मुलीस ताब्यात घेतली. व सुरक्षित तिच्या वडिलांच्या ताब्यात देण्यात आली.
अशाप्रकारे पोलिसांनी दाखवलेल्या कार्यतत्पुरतेमुळे एका 2 वर्षाच्या मुलीस सुरक्षित तिच्या पालकाच्या ताब्यात दिल्यामुळे अनुचित प्रकार टाळता आला.